हैल्दी वीट बर्फी(healthy wheat barfi recipe in marathi)

व्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी मी पॉस्टिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून बर्फी बनवले आहे.
नेहमीची साखर वापरण्या पेक्षा खडी साखरेचा वापर केला आहे .
झटपट होणारी ही बर्फी आहे.
हैल्दी वीट बर्फी(healthy wheat barfi recipe in marathi)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी मी पॉस्टिक म्हणजे गव्हाच्या पिठापासून बर्फी बनवले आहे.
नेहमीची साखर वापरण्या पेक्षा खडी साखरेचा वापर केला आहे .
झटपट होणारी ही बर्फी आहे.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ डबल पाणी घालून साधारणता एक तास भिजत ठेवावे, एका तासानंतर पीठा वरती आलेलं पाणी काढून टाकावे व खाली बसलेले पिठ थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व थोड्या वेळ बाजूला ठेवावे
- 2
एका पॅनमध्ये दोन वाट्या पाणी गरम करत ठेवावे व खडीसाखर मिक्सरमधून बारीक वाटून त्यात मिक्स करुन एक उकळी आणावी व त्यात बाजूला ठेवलेले गव्हाचं पीठ हळूहळू एकत्र मिक्स करून घ्यावे व एक चमचा तूप घालावे
- 3
मिश्रण दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यावे व त्यात रेट फूट कर घालून परत एक चमचा तूप घालून आणखी पाच मिनिटे शिजवावे. पँन च्या बाजूने तूप सुटेपर्यंत मिश्रण शिजवून घ्यावे व शेवटी परत एक चमचा तूप असे एकूण तीन चमचे तूप घालून मिश्रण एकजीव करून गॅस बंद करून त्यातच थोडं थोडं थंड करून घ्यावे
- 4
एका चौकोन भांड्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण पसरवून घ्यावे व रूम टेंपरेचरला थंड झाल्यावर त्याला पाहिजे त्या अकरात बर्फी कट करून घ्यावी.(मी हार्ट शेप दिला) डेसिकेटेड कोकोनट ने सजावट करून बर्फी सर्व करावे
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या (4)