दिल कचोरी (dil kachori recipe in marathi)

#Heart
#valentine's day special
#दिल कचोरी रेसिपी
दिल कचोरी (dil kachori recipe in marathi)
#Heart
#valentine's day special
#दिल कचोरी रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
कचोरीचे स्टफीन्ग साठी.....प्रथम मुगडाळ स्वच्छ धून 1-2 तास भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून ती मिक्सर मधून जाडसर वाटून घेणे. नंतर हिरवी मिरची, लसूण, कोथींबीर हे मिक्सर मधून बारीक करून घेणे.
- 2
नंतर गॅस वर कढई ठेवून त्यात 2 मोठे चमचे तेल घालावे. तेल गरम झाले कि त्या मध्ये हळद आणि वाटलेली मिरची घालावी.1 मिनिटे परतून त्या मध्ये वाटलेली डाळ घालावी. व सगळे एकत्र छान परतून घेणे. आता त्या मध्ये आवडीनुसार लाल तिखट, धने जीरे पूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घेणे.
- 3
आता या डाळी वर झाकण ठेवून मध्यम आचेवर 2-3 वाफा काढून घेणे. मधून मधून झाकण काढून डाळ हलवत राहणे. डाळ कढई ला चिकटू शकते. डाळ चांगली मोकळी होऊ लागते. झाकण काढून मोकळी झाली कि गॅस बंद करावा. स्टफीन्ग तयार झाले.
- 4
आता वरील आवरणासाठी.... परातीत कणिक, मैदा एकत्र करून घेणे. त्या मध्ये 3 मोठे चमचे तेल व चवीला थोडे मीठ घालून घेणे. आता हे तेल पिठाला चोळून घेणे. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून पुरी सारखी कणिक मळून घेणे. वरून तेल लावून 10 मिनिटे झाकून ठेवणे.
- 5
कणिक भिजली कि त्याचे पुरीला करतो त्या पेक्षा थोडा मोठा गोळा करून घेणे. त्याचे गोळे करून घेणे. व त्या तील 2 गोळे घेऊन त्याचे मध्यम अशी पुरी पेक्षा मोठी अशी थोडी जाडसर पोळी लाटून घेणे.
- 6
व त्या दोनीही पोळीचे हार्ट शेप करून घेणे. आता एक हार्ट शेप पोळी वर तयार केलेले सारण थोडे घालून घेणे. व त्या वर दुसरी हार्ट शेप पोळी ठेवून सगळ्या बाजूने बंद करून घेणे. अशा प्रकारे गोल किंवा तुमच्या आवडीनुसार आकार देऊन कचोरी करू शकता.
- 7
आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घेणे. व तयार केलेले ही हार्ट कचोरी मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेणे. मस्त खस्ता कचोरी तयार होते.
- 8
मस्त गरम गरम हिरवी चटणी, गोड चटणी किंवा तळलेली मिरची सोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
मुगडाळ खास्ता कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
खुसखुशीत यम्मी खास्ता कचोरी. Rupali Atre - deshpande -
आगळीवेगळी खस्ता कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक, #week12,,खूप वर्षांनी कचोरी बनवण्याचा योग आला..हेच तर कूक पॅड मुळे काहीतरी वेगळं नवीन प्रकार शिकायला मी करायला मिळतात..ही कचोरी माझ्या डोक्यात पण नव्हती असल्या तरेची कचोरी करायची...आणि कुणी विचार पण नसेल केला आणि मी पण नाही की असल्या साहित्यापासून कचोरी बनवू शकते..पण नेहमी प्रमाणे मी हा पण प्रयोगच केलेला आहे...घरी थोडीशी बुंदी उरलेली होती आणि चना जोर गरम पण थोडासा उरलेला होता मग विचार केला की चला करून बघूया याची कचोरीनेहमीच्या प्रकारापेक्षा थोडी वेगळी कचोरी ही आहे पण एकदम टेस्टी होते आणि ही कचोरी पंधरा दिवस प्रवासामध्ये टिकेल...चला तर करुया झटपट होणारी, सोप्या पद्धतीची कचोरी 🤩 Sonal Isal Kolhe -
चाट कचोरी/खस्ता मुगडाळ कचोरी (chaat kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडीआणिकचोरीरेसिपी post2भारतातील उत्तर प्रदेश हे कचोरी या पदार्थाचे ओरिजिन आहे, उत्तर प्रदेशात कचोरी अनेक ठिकाणी street food उपलब्ध असते.आता तर पूर्ण भारतातच प्रत्येक राज्यात विविध पदार्थाचां वापर करून कचोरी बनवली जाते व रसिक खवैयांची पसंती मिळते.कचोरी म्हटले की वेगवेगळे प्रकार प्याज कचोरी, मुगडाळ किंवा उडीद डाळ वापरून तयार केलेले कचोरी, चण्याचे पीठ वापरून तयार केली जाणारी शेगाव कचोरी, मावाकचोरी, दिल्ली येथील राज कचोरी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.आज आपण खस्ता मूग डाळ कचोरी व स्त्रीयांच्या आवडीचे चाट ह्याचे कॉम्बिनेशन करून एक भन्नाट, चविष्ट, चमचमीत अशी चाट कचोरी तयार करुया.चला तर पाहूया खस्ता मुगडाळ कचोरी+चाट कचोरी ची रेसिपी. Nilan Raje -
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
-
डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणी कचोरी रेसिपीजआजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला. Devyani Pande -
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
-
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
कांदयाची कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान ही कचोरी नेहची दुकानातुन विकत घेऊन खायचे कधी वाटले नवते की आपण कधी घरी असे बनवु शकतो आज कुकपॅड मुळे हे शकय झाले मी कचोरी बनवली आणि ती खुप छान झाली Tina Vartak -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
मिनी ड्रायफ्रूट मसाला कचोरी (mini dryfruit masala kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी 2कचोरीस्वरा चव्हाण यांचीं ही रेसिपी मी cooksnap केली आहे, मस्त झाली आहे. Varsha Pandit -
खस्ता कचोरी (Khasta Kachori recipe in mararthi)
#hr#होळी स्पेशल#खस्ता कचोरी आज माझ्या ४०० रेसिपीज पुर्ण झाल्या म्हणून ही खास रेसिपी. Sumedha Joshi -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.Pradnya Purandare
-
-
मिनी मुगदाळ कचोरी (Mini Moondal Kachori Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#मुगदाळ कचोरी Anita Desai -
दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मैत्रिणींनो , आम्ही अमरावतीला रहात असताना, तेथील एका हॉटेल मध्ये दही कचोरी खूप मस्त मिळायची तशी दही कचोरी नंतर कुठेच खायला मिळाली नाही. कारण आता ते हॉटेल बंद झालेय...पण कचोरी म्हटले की तीच कचोरी आठवते! म्हणून कचोरी करायची म्हटल्यावर दही कचोरीच करावीशी वाटली.... Varsha Ingole Bele -
ओल्या नारळाची कचोरी (olya naralachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#नारळीपौणिमा#post2सण, उत्सव व व्रते याच्या मागचे शास्त्र लक्षात घेऊन, श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे. पण तो पाळला जात नाही. म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रताच्या दिवशी तरी तो पाळला जावा.. म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रताचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणाऱ्या सण, धार्मिक उत्सव व व्रतामध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून, ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे, पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्याने भावनांचा ओलावा मिळतो. मग हाच ओलावा कायम ठेवण्यासाठी, भावाच्या आवडीचे बनवून त्याला खाऊ घालने, यात काही वेगळाच आनंद असतो....... माझ्या भावाला गोड फारस आवडत नाही. तिखट चटपटीत काहीतरी पाहिजे असतं. म्हणून मग त्याच्यासाठी त्याला आवडणारी *ओल्या नारळाची कचोरी* मी केली. खूप यम्मी आणि टेस्टी झाली ही कचोरी. लो फ्लेम वरती तळायची म्हणजे कचोरी चांगली क्रिस्पी होते. ही कचोरी तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये भरून एक आठवडा ठेवू शकता.करायची मग, *ओल्या नारळाची कचोरी*... 💃🏻💃🏻 Vasudha Gudhe -
शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)
#फ्राईडशेगाव कचोरी हा शेगाव चा प्रतिष्ठित ब्रांड आहे.शेगावला दरवर्षी लाखो भाविक गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला येतात आणि दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक ही कचोरी खाणयाचा मोह टाळू शकणार नाही.तर आज आपण तीच शेगाव स्पेशल कचोरी बघणार आहोत.Jyoti Ghuge
-
-
ग्रीन-पनीर कचोरी (green paneer kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी सारण मी वेगळं केलं आहे.कारण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. चव खूपच मस्त झाली आहे. Shital Patil -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#w2#कचोरीकचोरी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येते ती शेगावमधील प्रसिद्ध कचोरी. दिवसातील कोणत्याही वेळेला खाता येईल असा हा पदार्थ महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून खाल्ला जाणारा हा पदार्थ आज ६८ वर्षांचा झाला आहे. १९५० मध्ये देशाची फाळणी झाल्यानंतर पंजाबमधून शेगावात आलेल्या तिर्थराम शर्मा यांनी कचोरी सेंटर सुरु केले. येथील रेल्वे स्टेशनवर चरितार्थासाठी सुरु केलेला हा व्यवसाय नंतर शेगावची ओळख बनला. त्यांची ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली की लोकांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे त्यांनी आपल्या या लहानग्या दुकानाचे रुपांतर मोठ्या दुकानात झाले. गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येणारा प्रत्येक जण याठिकाणी आवर्जून कचोरी खातो. इतकेच नाही तर ही कचोरी आपल्या गावी पार्सल म्हणूनही नेली जातेआता ही कचोरी इतकी प्रसिद्ध झाली आहे की पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणीही आता ही शेगाव कचोरी मिळते. सध्या शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय करत असून करण शर्मा आणि लोहीत शर्मा हे आता हा व्यवसाय पाहतात. आता ही कचोरी परदेशातही मिळत असून त्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान वापरुन ती फ्रोजन केली जाते.माझ्या फॅमिली सर्वात आवडीची शेगाव कचोरीया कचोरीची स्वतःची की छान टेस्ट आहे तिच्याबरोबर काहीच घेतले नाही अशीच खायला ही कचोरी छान लागते. मी थोडा रेसिपीत स्वतःचे काही बदल करून तयार केली आहे नक्कीच करून बघा शेगाव कचोरी Chetana Bhojak -
-
खस्ता मटर कचोरी (khasta mutter kachori recipe in marathi)
#hrहोळी आली की पुरणपोळी, करंजी,मठरी, कचोरी, चाट अनेक पदार्थ आपण करतो.म्हणून होळी साठी खास खस्ता मटर कचोरी बनवली. Deepali dake Kulkarni -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#EB2#week2#शेंगावला गेलात गजानन महाराज चे दर्शन घेतले आणि तुम्ही शेंगाव स्टेशनवरती कचोरी खाल्ली नाही तर वारी फुकट जाते हे माहिती आहे का तुम्हाला त्यामुळे दर्शनासाठी बरोबर कचोरी खाणे आवश्यक आहे . Hema Wane -
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल ई -बुक चॅलेंज रेसिपी Week 2रेसीपी आलु कचोरी पण यामध्ये गव्हाचे पिठ आणि मैदा पारी साठी वापरला आहे Sushma pedgaonkar
More Recipes
टिप्पण्या