पोटॅटो स्पिनच बॉल्स (potato spinach ball recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटेचे छिलके काढून व्यवस्थित मॅश करून घ्यावे.
- 2
पालक, कांदा आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यावे.
- 3
आता एका कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे तडतडल्यावर त्यात कांदा घालून तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या टाकावे.
- 4
आता त्यात आले-लसूणपेस्ट आणि कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनिटे परतून घ्यावे.
- 5
आता त्यात पालक आणि मॅश केलेले बटाटे टाकून सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे.
- 6
आता त्यात तांदळाचे पीठ, बेसन आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे परतावे. परतल्यानंतर एक घट्ट गोळा बनलेला दिसेल.
- 7
हा गोळा एका प्लेट मध्ये काढून थंड होऊ द्यावा. थंड झाल्यावर दोन्ही
हाताला थोडे तेल लावून त्याचे छोटे-छोटे बॉल्स बनवून घ्यावे. कढईमध्ये तळण्यापूरते तेल घालून सर्व बॉल्स मध्यम आचेवर गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत. - 8
गरमागरम पोटॅटो-स्पिनच बॉल्स सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून चटणी सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes


























टिप्पण्या (2)