कुकिंग सूचना
- 1
प्राथम मिक्सरच्या भांड्यात सुके खोबरे तुकडे, कोथिंबीर, आले लसुण, टोमॅटो हे सर्व बारीक पेस्ट वाटून घ्यावे
- 2
आता एका बाउलमध्ये वाटलेला मसाला, शेंगदाणे कुट, हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, धणे पावडर, मीठ हे सर्व पाणी ना घालता सर्व मिक्स करा
- 3
आता वांगी स्वच्छ धुवून कोरडी केल्यावर देठ अर्धे कापा आणि वांग्याला 4 चिरा पडा आता त्यात तयार मसाला भरावा अशे सर्व वांगे भरून घ्यावे
- 4
आता गॅसवर काढाईत तेल गरम झाल्यावर त्यात कांदा गोल्डन होईपर्यंत परतून घ्या
- 5
आता कांदा परतल्यावर त्यात भरलेली वांगे घाला गॅस बारीक करा आणि काढाईला झाकण लावून 10 मिनिटे वाफवून घ्या पाणी घालू नये आता 1 साइड वाफवून झाल्यावर वांगे फिरवून 2 री साइड 10 मिनिटे वाफवून घ्यावी
- 6
आता वांगे वाफवल्यावर त्यात उरलेला मसाला घालावा आणि सर्व मसाला हळू हळू मिक्स करून 5 मिनिटे परतून घ्यावा गॅस बारीकच ठेवावा
- 7
आता रस्सासाठी लागेल तसे पाणी घालावे आणि काढाईला झाकण लावून गॅस बारीक करून वांगी चांगली मऊ शिजवून घ्यावी
- 8
आता झणझणीत भरली वांगी तयार आहे गरम गरम पोळी किंवा भाकरी आणि भाताबरोबर सर्व्ह करा
- 9
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या (7)