व्हेज फ्रंकी (veg frankie recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
व्हेज फ्रंकी (veg frankie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ आणि मैदा एकत्र नेहमीप्रमाणे कणीक भिजवुन घ्यावे.झाकुन ठेवावे.
- 2
उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्यावे.
तेल गरम करून त्यातआलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर स्मॅश केलेला बटाटा घालून हळद, मीठ आणि फ्रंकी मसाला घालून परतून घ्यावे. सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
थंड झाल्यावर. याचे लांबट कटलेट करून बटरवर शॅलो फ्राय करून घेणे. - 3
भिजलेले कणकेचे छोटे गोळे करून चपातीसारखे लाटून दोन्ही कडुन चांगले भाजुन घ्यावे.
- 4
एक चपाती वर एका बाजूला हिरवी चटणी त्यावर मेयाॅनिज,कटलेट,चिरलेली कोबी, कांदा, सिमला मिरची, फ्रंकी मसाला,टोमॅटो केचप आणि चीज किसून घालावे. हा रोल एका बाजूने घट्ट पण हलके गुंडाळून घ्यावे. आणि बटर घालून दोन्ही कडुन छान शेकुन घेणे.
- 5
हा पदार्थ गरम च छान लागतो.म्हणुन आयत्या वेळी च करून घ्यावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15809097



टिप्पण्या