मँगो नारळाची वडी (Mango Naralachi Vadi Recipe In Marathi)

#MDR
माझ्या आई साठी खास बनवली आहे. आई खोबऱ्याची वडी खूप छान करते. तिच्या रेसिपीत फक्त मी मँगो ऍड केला आहे. कारण तिला आंबा पण आवडतो आणि तिला ह्या वड्या आवडतील अशी आशा 😊
मँगो नारळाची वडी (Mango Naralachi Vadi Recipe In Marathi)
#MDR
माझ्या आई साठी खास बनवली आहे. आई खोबऱ्याची वडी खूप छान करते. तिच्या रेसिपीत फक्त मी मँगो ऍड केला आहे. कारण तिला आंबा पण आवडतो आणि तिला ह्या वड्या आवडतील अशी आशा 😊
कुकिंग सूचना
- 1
प्रथम नारळ सोलून खोबरे काढून कट करून घ्या.आता कट केलेले खोबरे मिक्सर मध्ये बारीक करून अथवा खिसनीने खीसून घ्या. आंब्याचा पल्प मिक्सर मध्ये एकदा फिरून वाटून घ्या.बाकी साहित्य काढून घ्या
- 2
आता कढईत तूप टाकून मध्यम आचेवर गरम करा तूप गरम झाले कि खोबऱ्याचा खिस ऍड करून 5-7 मिनटे परतून घ्या. आता यात साखर, दूध ऍड करून मिक्स करा
- 3
नंतर मँगो पल्प आणि खवा ऍड करा मिक्स करून साधारण 10-15 मिनिटे मिश्रण थोडे घट्ट होई पर्यंत परतून घ्या.आता यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून एकजीव करा. वडीचे मिश्रण तयार
- 4
एका ताटाला तूप लावून त्यात तयार वडीचे मिश्रण टाका आणि हाताने थापून घ्या.10 मिनिटे थंड होऊ द्या आता याच्या सुरीने वड्या पाडा.
- 5
मस्त मँगो नारळ वडी तयार.
Similar Recipes
More Recipes
- झणझणीत प्रान्स ग्रेव्ही (Prawn Gravy Recipe In Marathi)
- खव्याचे गुलाबजाम (Khawa Gulabjaam Recipe In Marathi)
- बदाम खजूर मिल्क शेक (Badam Khajoor Milkshake Recipe In Marathi)
- कांद्याची पीठ पेरून भाजी (Kandyachi Peeth Perun Bhaaji Recipe In Marathi)
- लाल भोपळ्याची कोशिंबीर (Lal Bhoplyachi Koshimbir Recipe In Marathi)


















टिप्पण्या