खव्याचे गुलाबजाम (Khawa Gulabjaam Recipe In Marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

खव्याचे गुलाबजाम (Khawa Gulabjaam Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

70, 75 गुलाबजाम
  1. खवा बनवण्यासाठी
  2. 2 लिटरदुध
  3. पाक बनवण्यासाठी
  4. 3 कपसाखर
  5. 3 कपपाणी
  6. गुलाब जामून बनवण्यासाठी
  7. 1/2 किलोखवा
  8. 3/4 कपरवा
  9. 1 टीस्पूनवेलची पावडर
  10. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  11. तेल (तळण्यासाठी)

कुकिंग सूचना

  1. 1

    घराच्या घरी खवा खवा बनविताना त्यासाठी जाड कढईत 2 लिटर दुध घाला आणि ते गॅसवर मध्यम आचेवर तापवत ठेवा. दुध एकदा चांगले उकळून घ्या. दुध चांगले उकळून वर आल्यावर गॅसची आच मंद करून दुध सतत ढवळत राहावे. चांगला घट्ट गोळा होईपर्यंत हलवत रहावे. दुधाचा घट्ट गोळा झाला कि समजायचे कि आपला खवा तयार झाला. 1 लिटर दुधापासून पाव किलो खवा बनू शकतो तर 2 लिटर दुधामध्ये अर्धा किलो खवा बनू शकतो.

  2. 2

    गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या वाटी मध्ये खवा घ्या आणि तो चांगला मळून एकजीव करून घ्या. मग त्यामध्ये रवा घालून हे मिश्रण चांगले एकत्र करून मळून घ्या. ते मळलेल पीठ 20 मिनिटे झाकून ठेवा त्यामुळे रवा चांगला फुलून येईल. आता यात थोडा थोडा सोडा घालून मळून घ्यावे. या खव्याच्या मिश्रणाचे छोटे छोटे म्हणजे पेढ्याएवढे गोळे करून घ्या.

  3. 3

    एका कढईमध्ये गोळे तळण्यासाठी तेल गरम करून तेल गरम झाले कि गॅसची आच मध्यम करा आणि त्यामध्ये एक एक करून तेलामध्ये जितके गोळे मावतील तितके गोळे टाकून ते गोळे लालसर होईपर्यंत मंद आचेवर चांगले तळून घ्या. एकावेळेस तेलामध्ये 8 ते 10 गोळे घालून ते तळून घ्या. कढईमध्ये जास्त गोळ्यांची गर्दी करू नका. असे सगळे गोळे तळुन घ्या.

  4. 4

    पाक बनवण्यासाठी
    प्रथम एक जाड बुडाचे पातेले घ्या. त्यामध्ये साखर घालून जेव्हढ्या वाट्या साखर तेव्हढ्याच वाट्या पाणी घ्या. आता हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि साखर विरघळेपर्यंत ते ढवळत रहा. मग त्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. साखर विरघळली म्हणजे याचा पाक तयार झाला. लगेचच गॅस बंद करा.
    महत्त्वाचे म्हणजे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी असा पाक करायचा नाही आहे.

  5. 5

    आता हे गोळे गरम पाकामध्ये घालून हलक्या हाताने चांगले एकत्र करा. हे गुलाबजाम एक तासासाठी पाकामध्ये मुरु द्या.

  6. 6

    गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes