कुरकुरीत भेंडी (Crispy Bhendi Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
#BKR
कुरकुरीत भेंडी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी धुऊन पुसून कोरडी करावी.
- 2
एका भेंडीचे दोन तुकडे करावेत व मधला बीयांचा भाग काढून परत दोन भाग करावेत.
- 3
नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, डाळीचे पीठ, तांदूळ पीठ घालून छान मिक्स करावेत. नंतर मीठ घालावे.
- 4
पीठ आणी मसाले भेंडीला व्यवस्थित लागले पाहिजे,म्हणून थोडस पाणी शिंपडून मिक्स करावेत.
- 5
नंतर तेल तापवून भेंडी तळून घ्यावीत. गरमागरम कुरकुरीत भेंडी चवीला छान लागतात. आवडत असल्यास वरून आमचूर पावडर घालू शकता.
- 6
कुरकुरीत भेंडी तयार आहेत.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16235140













टिप्पण्या