कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ स्वच्छ धुऊन पाच ते सहा तास भिजवून ठेवा नंतर निथळून वाटून घ्या. 10 मिनिटे बाजूला ठेवा.वाटताना पाणी जास्त टाकू नये.
- 2
वाटलेल्या मिश्रणात मीठ घालून छान फेटून घ्या.
- 3
नंतर त्याचे गोल वडे करून तळून घ्या. हिंग आणि मीठाच्या पाण्यात सोडा.
- 4
कोथिंबीर, पुदिना,मिरची मिक्स मधून बारीक करून घ्यावेत.हिरवी चटणी तयार.
- 5
दह्यात मीठ,साखर घालून फेटून घ्या.पाण्यातील वडे काढून दाबून घ्या.त्यातील पाणी काढा.
- 6
आता सर्व्हिंगची तयारी. एका डिश मध्ये वडे काढून घ्या.त्यावर दही घाला,हिरवी चटणी,चिंचेची चटणी,जीरे पावडर, लाल तिखट घालून सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16253359















टिप्पण्या