वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.
मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे.

वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)

भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.
मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 3वांगी
  2. 2मध्यम आकाराचे बटाटे
  3. 1मध्यम आकाराचा कांदा
  4. १ १/२ टेबलस्पून कांदा लसूण मसाला
  5. 1 टीस्पूनगरम मसाला
  6. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनजीरे -मोहरी
  9. १/८ टीस्पून हिंग
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. 2-3 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  12. 1 टेबलस्पूनतेल.जास्त हवे असल्यास अजून घालणे
  13. पाणी

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    बटाटे सालून घेणे. बटाटे व वांगे यांच्या फोडी करून घेणे. फोडी पाण्यात घालून ठेवणे. कांदा बारीक चिरून घेणे.

  2. 2

    गॅसवर कढईत तेल टाकून तापत ठेवणे. जीरे,मोहरी,हिंग यांची फोडणी करून घेणे. कांदा घालून गुलाबीसर भाजून घेणे.

  3. 3

    सर्व मसाले घालून व्यवस्थित परतून घेणे. थोडेसे पाणी घालून घेणे.

  4. 4

    चवीप्रमाणे मीठ घालून, उकळी आल्यानंतर कढईवरती झाकण ठेवावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.*गोडा मसाला वरून घातला,विसरला होता म्हणून.

  5. 5

    अधून मधून भाजी शिजली की नाही ते पहावे. भाजी शिजली व पाणी आटले की शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेणे. थोडासाच रस्सा असू द्यावा. गॅस बंद करावा.

  6. 6

    तयार भाजी चपाती,भाकरी, भाता सोबत तुम्ही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes