झुणका (Zunka Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
कधी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर, झुणका करायचा.चवीला मस्तच.
झुणका (Zunka Recipe In Marathi)
कधी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर, झुणका करायचा.चवीला मस्तच.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत त्यामधे हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून टाकावी.
- 2
नंतर त्यामधे हळद, लाल तिखट, ओवा,हिंग मीठ घालून छान मिक्स करून घ्यावेत.
- 3
नतर त्यामधे डाळीच पीठ घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावेत.
- 4
तवा तापल्यावर त्यावर तेल घालून मिश्रण छान पसरवून घ्या.एका बाजूने खरपूस रंगावर भाजल्यावर बाजू पलटी करा व पोळा उलथण्याने कुस्करून घ्यावा. आवश्यकतेनुसार तेल टाका.
- 5
पोळा कुस्करल्या नंतर तेल टाकून मंद आचेवर झुणका खरपूस भाजून घ्या.
- 6
पाच मिनिटानी गॅस बंद करा. गरमागरम झुणका खाण्यासाठी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16437231












टिप्पण्या (3)