मधुश्री मॅजिक(नो शुगर नो फॅट) (Madhushri Magic Recipe In Marathi)

#ATW2
#TheChefStory
#मधुश्री मॅजिक
हे एक असे डेजर्ट मी शोधून काढले यामध्ये साखर अथवा तूप / तेल काहीही नाही. या डेजर्ट मध्ये कमीत कमी साहित्य वापरले आहेत. केवळ नारळाचं दूध व मध वापरून केल्यामुळे मी याचे नाव मधु म्हणजे मध व श्रीफळ म्हणजे नारळ म्हणून याचं नाव मधुश्री मॅजिक असे दिले आहे. शिवाय अतिशय चविष्ट व लवकर बनणारा हा पदार्थ आहे.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम नारळाचे दूध काढून घ्यावं. या दुधातून अर्धी वाटी दूध काढून घ्या. आता हे दूध गॅसवर एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवा.
- 2
आता अर्धे वाटी दूध वेगळे काढून ठेवलेल्या दुधामध्ये कॉर्नफ्लोअर मिसळा.गॅस वरील दुधाला उकळी आली की यात ड्राय फ्रूट पावडर घाला.थोडे उकळू द्या.
- 3
आता यात कॉर्नफ्लोर चे दूध घाला.सतत चमच्याने हलवत राहा.मिश्रण घट्ट सर होत आले की यात गॅस बंद करून मध मिसळा. मफिन,कप केक साच्याला ग्रीस करून हे मिश्रण चमच्याने ओता.
- 4
हे कप केक फ्रिज मधे दोन तास ठेवा. सेट होऊ द्या. सर्व्ह करताना प्लेट मधे कप केक उलटा अन् मोल्ड करा.वरून रंगीत स्प्रींकल टाका.साईडने गोल्डन बॉल्स ने डेकोरेट करा.वरून पुदिना पाने लावा आणि सर्व्ह करा हे अप्रतिम डेझर्ट.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या