झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)

#choosetocook
#ChooseToCook
कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते.

कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका बोल मध्ये चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो,चिरलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घ्या.
- 2
नंतर त्यामध्ये हळद, मीठ व लाल तिखट घाला व हे सर्व छान मिक्स करून घ्या.
- 3
आता ब्रेडचे स्लाईस घेऊन त्यावर हे मिश्रण चमच्याने पसरवा.
- 4
नंतर त्यावर आवडीनुसार चीज घाला. आणि वरतून एक ब्रेडचे स्लाईस ठेवा. आणि वरतून थोडा दाब देऊन सँडविच प्रेस करून घ्या.
- 5
पॅन वर बटर गरम करून सॅंडविच छान दोन्ही बाजूने मध्यम आचेवर टोस्ट करून घ्या.
- 6
गरमा गरम कांदा टोमॅटो टोस्ट सँडविच चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)