कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कारली स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर साल काडीने थोडेसे पातळ वरचे टोकदार साल काढून टाकावी. आता कारल्याचे पातळ काप करावे आणि त्या मधल्या बिया काढून टाकाव्या म्हणजे कारलं कडू होत नाही. त्यानंतर चिरलेले कारल्याला एक टेबलस्पून मीठ चोळावे आणि अर्धा तास भांड्यामध्ये ठेवून द्यावे. आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. त्यानंतर मसाल्याची तयारी ठेवावी. अर्धा तासानंतर कारल्याचे काप पाण्याने धुऊन चांगले पिळून काढावे. यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो.
- 2
आता एका पॅनमध्ये तेल घालून गरम करावे. त्यानंतर मोहरी, जीरे आणि हिंग घालून फोडणी द्यावी. त्यानंतर कांदा घालावा आणि थोडासा परतावा.
- 3
आता टोमॅटो घालावा आणि लगेचच कारल्याचे काप घालावे आणि चांगले मिक्स करून परतून घ्यावे मंद गॅस वर. आता 5 मिनिटे झाकण ठेवून थोडे शिजू द्यावे. मधून मधून परतत राहावे. कारले थोडे शिजत आले की त्यामध्ये हळद आणि मीठ घालावे आणि चांगले मिक्स करून परतत राहावे.
- 4
आता दाण्याचा कूट खोबरं आणि गुळाची तयारी ठेवून कारल्यामध्ये घालावे आणि चांगले परतवून घ्यावे. परत एकदा 2-3 मिनिटे झाकण ठेवावे आणि शिजू द्यावे. त्यानंतर कोथिंबीर घालावी आणि चांगले परतून घ्यावे.
- 5
आता आपली कारल्याची भाजी तयार. सर करताना त्यामध्ये वरून ओल्याचे खोबरे आणि कोथिंबीर घालावी.
Top Search in
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या
Tumhi सगळ सांगितलं पण चटणी कधी टाकायची सांगितलं नाही.