गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

Neelam Ranadive @NeelamVRanadive
#Cookpadturns6
Birthday Special
कुकिंग सूचना
- 1
प्रथम केशराच्या काड्यांमध्ये २ टी स्पून गरम दूध घातले. गाजराची साल काढून गाजर किसून घेतली. नंतर एका भांड्यात साजुक तूप तापवून त्यांत लवंगा घातल्या. नंतर त्यांत गाजर परतवून घेतले.
- 2
नंतर त्यांत दूध घालून परतवून परतवून शिजवून घेतले. नंतर त्यांत मावा व साखर घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले.
- 3
गाजर छान शिजल्यावर त्यांत वेलची पावडर, दुधांत भिजवलेले केशर व जायफळ पूड घातली व सर्वांत शेवटी त्यांत बदाम, काजू, पिस्त्याचे काप व मनुका घातल्या व सर्व एकजीव केले.
- 4
झाला गाजर हलवा तयार. नंतर काजू पिस्त्याने सजावट करून गाजर हलवा सर्व्ह केला.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16684583












टिप्पण्या