गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#Cookpadturns6
Birthday Special

गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)

#Cookpadturns6
Birthday Special

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
६ जणांसाठी
  1. 500 ग्रॅमगाजर
  2. 150 ग्रॅममावा
  3. 150 ग्रॅमसाखर
  4. 2 टे. स्पून साजुक तूप
  5. 7-8लवंगा
  6. 1/2 कपदूध
  7. 1 टीस्पूनवेलची पावडर
  8. 1 टीस्पूनजायफळ पावडर
  9. 10-12केशराच्या काड्या
  10. काजू, बदाम पिस्त्याचे काप
  11. 2 टे. स्पून मनुका

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम केशराच्या काड्यांमध्ये २ टी स्पून गरम दूध घातले. गाजराची साल काढून गाजर किसून घेतली. नंतर एका भांड्यात साजुक तूप तापवून त्यांत लवंगा घातल्या. नंतर त्यांत गाजर परतवून घेतले.

  2. 2

    नंतर त्यांत दूध घालून परतवून परतवून शिजवून घेतले. नंतर त्यांत मावा व साखर घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले.

  3. 3

    गाजर छान शिजल्यावर त्यांत वेलची पावडर, दुधांत भिजवलेले केशर व जायफळ पूड घातली व सर्वांत शेवटी त्यांत बदाम, काजू, पिस्त्याचे काप व मनुका घातल्या व सर्व एकजीव केले.

  4. 4

    झाला गाजर हलवा तयार. नंतर काजू पिस्त्याने सजावट करून गाजर हलवा सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes