कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्याची तयारी करावी. बासमती तांदुळ एक वाटी पाणी घालून भिजत ठेवावा साधारण 10 मिनिटं. कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यावा.
- 2
आता कढई मध्ये तेल घालून गरम करून मोहरी जीरे यांची फोडणी द्यावी. त्यानंतर मिरची, आले आणि लसूण घालावा.
- 3
आता लसूण थोडा लालसर झाल्यावर कांदा घालावा आणि थोडा परतावा. त्यानंतर मटार घालावी आणि थोडी परतून घ्यावी.
- 4
आता त्यामध्ये टोमॅटो घालावा आणि चांगला परतून घ्यावा. त्यानंतर हळद आणि हिंग घालावे आणि परतून घ्यावे. त्यानंतर सर्व मसाले घालावे- लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, आणि चांगले मिक्स करून परतून घ्यावे. एका बाजूला 2 & 1/2 वाटी पाणी गरम करायला ठेवावे.
- 5
भिजवलेल्या तांदूळ मधून पाणी काढून टाकावे आणि बासमती तांदूळ कढई मध्ये घालावा आणि चांगला मिक्स करून घ्यावा. त्यामध्ये मीठ घालावे आणि कोथिंबीर घालावी आणि चागले मिक्स करून परतून घ्यावे.
- 6
आता गरम केलेले पाणी घालावे आणि 2 टेबलस्पून साजूक तूप घालावे. आता कढईवर झाकण ठेवून 8-10 मिनिटे शिजू द्यावे. गॅस मध्यम ठेवावा.
- 7
आता आपला मटर राईस तयार झाला आहे. गरम गरम सर्व्ह करावा.
Similar Recipes
More Recipes
























टिप्पण्या