कुकिंग सूचना
- 1
भातासाठी:
एका पातेल्यात पाणी उकळा. त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंगा, हिरवी आणि काळी वेलची, शाही जीरा, दालचिनीच्या काड्या, लिंबाचा रस आणि मीठ घाला.
पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेला तांदूळ घाला.
त्यामध्ये तूप घाला आणि तांदूळ 70-80% पर्यंत शिजवा.
सुमारे 7-8 मिनिटे मध्यम आचेवर भात शिजवून घ्या. - 2
बिर्याणीचे थर लावण्यासाठी-
अंडी उकडून,सोलून घ्या. - 3
एका मोठ्या भांड्यात तेल गरम करा आणि संपूर्ण मसाले घाला.
- 4
काही सेकंदांनंतर आले लसूण पेस्ट सोबत चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घाला. ते हलके तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
- 5
त्यामध्ये मीठ, तिखट, हळद, बिर्याणी मसाला आणि दही घालून मिक्स करा.
- 6
आवश्यक असल्यास थोडं पाणी घाला.आता त्यात उकडलेले अंडे टाका.
- 7
आता त्यावर शिजवलेल्या भाताचा थर लावा.भातावर थोडा बिर्याणी मसाला शिंपडा.त्यावर थोडे तूप आणि कोथिंबीर घाला.
- 8
झाकण ठेवा. (तुम्हाला हवे असल्यास तुम्ही झाकणाला कणिक लावून ठेवू शकता.)
10 मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. - 9
कोथिंबीर टाकून सजवा आणि तुमच्या आवडीच्या रायत्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.
Top Search in
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या