अंडा बिर्याणी (Anda Biryani Recipe In Marathi)

Rutuja Patil |Ek_KolhaPuri
Rutuja Patil |Ek_KolhaPuri @ek_kolhapuri

अंडा बिर्याणी (Anda Biryani Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाट्याबासमती तांदूळ, भिजवलेला
  2. 6अंडी
  3. 3कांदे, चिरलेले
  4. 2टोमॅटो, चिरलेले
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  7. 1/2 टीस्पूनहळद पावडर
  8. 1तमालपत्र
  9. 4लवंगा
  10. 4-5काळी मिरी
  11. 1 इंचदालचिनी
  12. 2-3बदाम फूल
  13. 1 टीस्पूनआले आणि लसूण पेस्ट
  14. 2 चमचेदही
  15. 2 टीस्पूनबिर्याणी मसाला
  16. 1 चमचालिंबाचा रस
  17. कोथिंबीर
  18. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    भातासाठी:
    एका पातेल्यात पाणी उकळा. त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, लवंगा, हिरवी आणि काळी वेलची, शाही जीरा, दालचिनीच्या काड्या, लिंबाचा रस आणि मीठ घाला.
    पाण्याला उकळी आली की त्यात भिजवलेला तांदूळ घाला.
    त्यामध्ये तूप घाला आणि तांदूळ 70-80% पर्यंत शिजवा.
    सुमारे 7-8 मिनिटे मध्यम आचेवर भात शिजवून घ्या.

  2. 2

    बिर्याणीचे थर लावण्यासाठी-
    अंडी उकडून,सोलून घ्या.

  3. 3

    एका मोठ्या भांड्यात तेल गरम करा आणि संपूर्ण मसाले घाला.

  4. 4

    काही सेकंदांनंतर आले लसूण पेस्ट सोबत चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घाला. ते हलके तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.

  5. 5

    त्यामध्ये मीठ, तिखट, हळद, बिर्याणी मसाला आणि दही घालून मिक्स करा.

  6. 6

    आवश्यक असल्यास थोडं पाणी घाला.आता त्यात उकडलेले अंडे टाका.

  7. 7

    आता त्यावर शिजवलेल्या भाताचा थर लावा.भातावर थोडा बिर्याणी मसाला शिंपडा.त्यावर थोडे तूप आणि कोथिंबीर घाला.

  8. 8

    झाकण ठेवा. (तुम्हाला हवे असल्यास तुम्ही झाकणाला कणिक लावून ठेवू शकता.)
    10 मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या.

  9. 9

    कोथिंबीर टाकून सजवा आणि तुमच्या आवडीच्या रायत्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Patil |Ek_KolhaPuri
रोजी
cooking is love,made visible🧑‍🍳❤️ Instagram - https://instagram.com/ek_kolhapuri?igshid=YmMyMTA2M2Y=
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes