पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
पुरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्या टोमॅटो चिरा, लसणाच्या पाकळ्या एका खलबत्त्यामध्ये कोथिंबीर कांदा कढीपत्ता हिरवी मिरची लसूण हे सर्व घालून अर्धवट वाटून घ्या.
- 2
एका पॅनमध्ये तेल घालून राई हिंग जिरं घाला. त्यानंतर त्यात वाटलेलं सगळं वाटण घाला. हळद, तिखट, गरम मसाला घालून थोडे पाणी घाला आणि छान परतवून घ्या.
- 3
आता कणीक मीठ,थोडं तेल,ओव घालुन भिजवून घ्या. दहा मिनिटे झाकून ठेवा. आता छान परतलेल्या रस्सामध्ये उकडलेला बटाटा, मटार घाला चवीनुसार मीठ घाला आणि छान दणदणीत भाजीला वाफ येऊ द्या.
- 4
आता कणकेचा एक गोळा घ्या आणि त्याची एक मोठी पोळी लाटा. आणि छोट्या वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या करून गरम गरम तेलात तळून घ्या. आणि सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16753141















टिप्पण्या