तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्याची तयारी करावी. गुळ बारीक चिरून घ्यावा खोबरे किसून घ्यावे दाणे भाजून दाण्याचा कूट करावा. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तीळ भाजून घ्यावे. खोबरे भाजून घ्यावे.
- 2
आता एका परातीत तिळ,भाजलेले खोबरे घालावे त्याचबरोबर दाण्याचा कुट घालावा, वेलची पावडर घालावी आणि सगळं मिक्स करून घ्यावे. त्यानंतर कढई मध्ये चिक्कीचा गुळ घालून पातळ करून घ्यावा. गॅस बंद करावा. त्यानंतर तीळ, खोबरे आणि दाण्याच्या कुटाचे मिश्रण ह्या गुळामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्यावे.
- 3
आता हे मिश्रण एका परातीत काढून लगेचच छोटे छोटे गोळे करून लाडू वळावे. आता आपले तिळगुळ लाडू तयार झाले.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16754664










टिप्पण्या (2)