कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)

डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण.
कैरीचे वरण (Kairich Varan Recipe In Marathi)
डाळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वरण वेगवेगळ्या प्रकारे करता येते आणि त्यात कैरी आणि गूळ घालून केलेले आंबट गोड वरण जेवणाची रंगत नक्कीच वाढवते.तर आपण बघूया आज कैरी चे वरण.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन एक हिरवी मिरची उभी चिरून, मीठ आणि हळद घालून कुकरला २ शिट्या काढून घ्याव्यात.
- 2
कैरीची साल काढून, मध्यम आकाराच्या फोडी करून त्याला मीठ चोळून ठेवावे. नंतर कुकर सुटल्यानंतर एका पातेल्यात फोडणीसाठी तेल घालून त्यात राई,मेथी,कडीपत्ता, हिंग घातल्यानंतर कैरीच्या फोडी घालून झाकून दोन मिनिटं वाफ काढून घ्यावी.
- 3
कैरी शिजल्यानंतर त्यात कुकरला शिजलेली डाळ ओतावी आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात जाड- पातळ करून घ्यावी नंतर त्यात गुळ व आवश्यकतेनुसार मीठ घालून उकळल्यानंतर कोथिंबीर घालावी आणि गरम भाताबरोबर सर्व्ह करावी.
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ- नवलकोल (Dal Navalkol Recipe In Marathi)
#DR2रोजच्या जीवनात अविभाज्य असलेली डाळ किंवा वरण वेगवेगळ्या प्रकारे कसं करता येईल त्यासाठी गृहिणी दक्ष असते. चव पण बदलावी आणि चविष्ट पण असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. असं हे रोज केलं जाणार वरण खूप प्रकारे करता येते. थंडीत मिळणारा नवलकोल डाळीत घालून डाळीची चव आणखीनच वाढवता येते तर आपण बघूया नवलकोलाची डाळ. Anushri Pai -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण Pooja Katake Vyas -
कैरीचे मिश्र डाळींचे आंबटगोड वरण (daaliche ambat god varan recipe in marathi)
#pcr # कूकरच्या उपयोग स्वयंपाकात विविध प्रकारे करतो आपण. मी आज मिश्र डाळींचे ,कैरी टाकून वरण शिजविले आहे त्यात.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
कैरीचे आंबट फोडणीके वरण (kairiche ambat varan recipe in marathi)
#dr#कैरीचेवरण#dal#दाल#डाळ लोणचे तयार करताना कैर्याना आपण जी हळद मीठ लावतो हळद मीठ लावल्यानंतर कैरीपासून जे पाणी सुटते ते पाणी डाळ बनवण्यासाठी ठेवले होते त्या पाण्याचा वापर करून आंबट अशी डाळ तयार केलीत्या पाण्याचा वापर करून डाळ खूप छान तयार झाली आहे पाण्यात हळद,मीठ असल्यामुळे डाळ तयार करताना हळदीचा ,मिठाचा वापर केला नाहीआपण रोज डाळ करतो मग अशा वेळेस अशा प्रकारची डाळ तयार करून खाल्ली तरी खूप छान लागते आणि कैरीच्या पाण्याचा ही उपयोग होतो शेवटी आंबट पाण्याचा चाही स्वादाचा वापर डाळ करताना केला तर डाळीची चव वाढतेबघूया उरलेल्या कैरीच्या पाण्याचा उपयोग करून तुरीची फोडणीचे वरण कशे तयार केले Chetana Bhojak -
फोडणीचे वरण २ (phodniche varan recipe in marathi)
#drतुरीच्या डाळीचे वरण ..त्यात टोमॅटो,कोथिंबीर ,मिरची वापरली आहे...अप्रतिम चवीचे वरण... Preeti V. Salvi -
टोमॅटोचे आंबट वरण (tomatoche ambat varan recipe in marathi)
# ngnrश्रावण शेफ वीक 4आंबट वरण सात्विक आहे. चिंच गुळ घालून साधा मसाला वापरून हे वरण केले जाते. आमच्याकडे हे वरण सर्वांना खुप आवडते. Shama Mangale -
फोडणीचे आंबट गोड वरण (phodniche ambat god varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे आंबट गोड वरणमला आठवते आमच्या लहानपणी आई रोज घट्ट वरणाचा गोळा... एका पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवायची सकाळी साधा वरणआणि संध्याकाळी त्यालाच... मस्त फोडणीचे आंबट गोड वरण करायची बाकी काहीही नसलं जेवायला तरी चालायचे... त्या वरणाला चव इतकी छान राहायची की, भाजी ची सुद्धा गरज भासत नव्हती... तेच फोडणीचे आंबट गोड वरण पाहुयात रेसिपी ..... Shweta Khode Thengadi -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr"फोडणीचे साधे वरण" तूरीच्या डाळीला अंगभूत चव नसते. पण मोजके चार घटक घालून, तिला जी अप्रतिम चव येते, त्याला तूलना नाहीच...!!वरणाचे प्रकार तसे बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात सोपा, आणि बहुतेकांच्या घरी केला जाणार प्रकार म्हणजे, "फोडणीचे साधे वरण" जास्त ताम झाम न करता, खमंग फोडणी दिलेले वरण त्या सोबत मऊ भात लिंबू आणि तुपाची धार...अहाहा बस आणखी काही काही नको....!!! Shital Siddhesh Raut -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे वरणलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, तूरडाळीबरोबरच इतर डाळींचा वापर करून केला जाणारा पदार्थ म्सणजे डाळभात, वरणभात. कोणत्याही आजारात पचनास हलकं म्हणूनही मूगाच्या डाळीचं वरण भाताबरोबर दिलं जातं. पण कोणत्याही व्हेज जेवणात या वरणाचे विविध प्रकार केले जातात आणि जेवणाची रंगत वाढवली जाते. मीसुद्धा विविध प्रकारे वरण करते. आजही अगदी साध्या पद्धतीचे फोडणीचे मी केले आहे, पाहूया रेसिपी. Namita Patil -
पुणेरी फोडणीचे आंबट, गोड, तिखट वरण (ambat god tikhat varan recipe in marathi)
तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा आंबट गोड तिखट वरण# पश्चिम महाराष्ट्र#KS2 Mrs. Snehal Rohidas Rawool -
कैरीचे आंबट गोड वरण (kairich ambat god varan recipe in marathi)
#कुकस्नॅपहेमा वाणे मॅडम ची कैरीचे वरण रेसिपी कुक स्नॅप केली.खूपच टेस्टी वरण झाले. Preeti V. Salvi -
नागपुरी फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#ks3भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात त्याचप्रमाणे खाद्यसंस्कृती ही बदलत जाते. खरंतर वरण आपण खूप पद्धतीने बनवत असतो, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावातलं, जिल्ह्यातलं वरण बनवण्याची किंवा भाज्या बनवण्याची पद्धत थोड्या फार फरकाने बदलत जाते तिथल्या हवामाना प्रमाणे रूचतील पचतील अशा पद्धतीने जेवण बनवले जाते. आज आपण नागपुरी पद्धतीचे फोडणीचे वरण कसे बनवायचे ते बघूया.... Vandana Shelar -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपी#आंबेडाळ#rawmango#कैरीडाळमहाराष्ट्राची फेमस अशी साईड डिश म्हणून ताटात वाढली जाणारी आंबेडाळ सर्वत्रच उन्हाळ्यात आवर्जून खाल्ली जाते .उन्हाळ्याची खास अशीही रेसिपी तसेच चैत्राची चाहूल लागताच अशा प्रकारचे पदार्थच आवडायला लागतातचैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या डाव्या साईडला पानावर वाढला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थउन्हाळ्यात असे पदार्थ जेवणातून छान लागतात बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या मिळत आहे आहे मग अशा प्रकारचे पदार्थ बनवून खाल्ले तर अजून जेवणाला रंगत येते. उन्हाळात पोळी भाजी असे पदार्थ जरा कमी आवडतात मग डाव्या साईडचे पदार्थ उन्हाळ्यात जास्त आवडू लागतात मग तो मेथांबा, लोणचे, कोशिंबीर, दही, ताक ,चटण्या हे जेवणाची रंगत वाढवतात मग जेवणही आवडू लागते. हा पदार्थ पौष्टिकही आहे .आंबेडाळ साईड डिश म्हणून ताटात सर्व केली जाते. पूर्ण जेवणाची चव हे आंबेडाळ वाढवते'उन्हाळ्यात जेवणाची रंगत वाढूया आंबेडाळ वाटूया'मग या उन्हाळ्यात नक्कीच आंबेडाळ बनवून बघा आणि खाऊनही बघा खूपच छान चविष्ट असा पदार्थ आहे Chetana Bhojak -
कोथिंबीर वरण (आमटी) (kothimbir waran recipe in marathi)
#डाळमाझ्या माहेरी पारंपरिक साध्या वरणाबरोबर तूरडाळ चे विविध प्रकारे वरण ( आमटी) केले जाते. यातलाच एक माझा अतिशय आवडता प्रकार म्हणजे कोथिंबीर घालून केलेले तूरडाळ वरण. कोथिंबीर वापरल्यामुळे या वरणाला फारच सुंदर चव आणि सुगंध येतो. करायला अगदी सोपे आणि तितकेच चविष्ट.( यात कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या दोऱ्याने बांधून टाकल्यास खूपच छान सुवास येतो)Pradnya Purandare
-
आंबा-डाळ (Aamba dal recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा#कैरी डाळजेवणात चविष्ट साईड डिश असेल तरी जेवणाची रंगत न्यारीच, कैरी आणि चना डाळीचे चविष्ट अशी चटणी Manisha Malvi Angaitkar -
-
कांद्याकैरीचे वरण
उन्हाळ्यात पाणी पिऊनच पोट भरतं, काही जेवायची इच्छाच नसते त्यावेळी हे कांदाकैरीचं चटकदार वरण कमला येतं, आणि दोन घास सरस जातात. नूतन सावंत -
वरण(फोडणीचे) (varan recipe in marathi)
#dr# दाल रेसिपीफोडणीचे वरण झटपट होणारी रेसिपी आहे विदर्भामध्ये शक्यतोवर लगेच काही बनवायचं असेल भाजी लाऑप्शन नसेल तर लगेच फोडणीचं वरण करतात. येन वेळी पाहुणे आले तरी झटपट होणार आहे.फोडणीचं वरण भाताबरोबर एकदम चविष्ट लागते चलातर रेसिपी बघूया. Priyanka yesekar -
शेवग्याच्या शेंगांची डाळ (Shevgyachya Shenganchi Dal Recipe In Marathi)
#RDRजेवण म्हटलं की डाळ ही हवीच. पण आपण गृहिणी फक्त डाळीचे किती वेगवेगळे प्रकार करत असतो! आणि आता सध्या शेवग्याच्या शेंगा मस्त मिळू लागल्या आहेत. शेंगा पण विविध प्रकाराने आपण खाऊ शकतो. डाळीतल्यातल्या शेंगा तेवढ्याच छान लागतात, आणि डाळीला एक प्रकारची विशिष्ट चव लागते. पाहूया शेवग्याच्या शेंगांची डाळ. Anushri Pai -
वरण फळ(Varan Fal Recipe In Marathi)
#varanfal#वरणफळ#Daldhokli#chakolyaरात्रीचा जेवणात वरणफळ हा परफेक्ट असा वन पॉट मील आहे रात्रीच्या जेवनातून घ्यायला खूप छान लागते सगळ्यांना आवडते ही आवडीने खाल्ले जाते.वरणफळ बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतो त्यात खट्टा- मीठा फ्लेवर दिला तर अजून छान लागते वरणफळ बरोबर पापड चुरून खाल्ला तर खूप चविष्ट लागते. Chetana Bhojak -
-
मेथीचे वरण (methiche varan recipe in marathi)
#GA4#week2#keyword_fenugreekमेथीचे वरण Shilpa Ravindra Kulkarni -
हिंगाचे वरण (hingache varan recipe in marathi)
#dr डाळीचे बरेचसे प्रकार करता येतात. आंबट, गोड, तीखट , पण माझ्या मुलाने लहानपणी त्याला हींग का डींक यामधून कनफ्युजन होउन त्याने त्याला डींकाचे वरण असे दिले व आजही आम्ही त्याला डिंकाचे वरण म्हणतो. त्याला खुप आवडते.तीखट नसल्या मुळे सुप प्रमाणे घेउ शकतो. Shobha Deshmukh -
मुंगडाळीचे तडका वरण (moong daliche tadka varan recipe in marathi)
#dr......मूगडाळ– ही डाळ अगदी हलकी, पथ्याची डाळ आहे. प्रथिने शरीरात शोषले जाण्यासाठीचे घटक या डाळीत चांगल्या प्रमाणात आहेत. यातले विरघळण्याजोगे तंतुमय पदार्थ (सोल्युबल फायबर्स) शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात. मूगडाळीतला ‘आयसोफ्लॅवॉन’ हा घटक ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकासारखा परिणाम देतो. त्यामुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या वेळी मूगडाळ चांगली ठरते. या डाळीत ‘बी- १२’ सोडून इतर सर्व ‘बी’ जीवनसत्त्वे असतात. ‘सी’ जीवनसत्त्व आणि फॉलिक अॅसिडही यात असल्यामुळे ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली. Jyotshna Vishal Khadatkar -
वरण चकोल्या (varan chakolya recipe in marathi)
#drवरण चकल्या ही एक पूर्ण जेवणाची डिश आहे आणि सर्वांच्याच आवडीची. पावसाळ्याचा दिवसात तर गरमागरम वरण चकल्या खायची गोष्टच वेगळी आणि त्यावर मनसोक्त तुपाची धार मग काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
गोड वरण (god varan recipe in marathi)
#वरण # वरण भात हे महाराष्ट्रातील सर्वच घरी बनते. गरम गरम वरण भात आणि वरून साजूक तुपाची धार असली म्हणजे जेवायला जी मज्जा येते काही विचारू नका. मी अगदी साधंच वरण बनवते. माझ्या मुलांना कधीच वरण भाताचा कंटाळा येत नाही. Shama Mangale -
फोडणीचे वरण १ (phodniche varan recipe in marathi)
#drवेगवेगळ्या डाळी वापरून ,वेगवेगळ्या प्रकारची फोडणीचे साहित्य किंवा वेगवेगळे मसाले ,जिन्नस वापरून बऱ्याच प्रकारचे फोडणीचे वरण आपण करतो.त्यापैकी एक . Preeti V. Salvi -
नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)
#dr#पारंपरिक रेसीपी हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा.. Shital Muranjan -
कैरी डाळ (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#फॅमिली .... हो फॅमिली म्हंटले की घर आणि घरात राहणारे रक्ताची नाती.....त्यातल्या त्यात आई वडील म्हणजे आपला एक अविभाज्य घटक....आजची रेसिपी कैरी डाळ ही माझ्या फॅमिली साठी बनविली आहे त्यांना डेडीकेटेड आहे....👩🏻🍳💯👍🏼 Pallavii Bhosale -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr #दाल_रेसिपीज #फोडणीचे वरण भारतीय आहारसंस्कृती मध्ये तूरडाळ,मूगडाळ,उडीदडाळ,मसूरडाळ अशा कितीतरी डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश आहे.या डाळी आणि कडधान्ये म्हणजे protein चे power house ...शाकाहारी लोकांसाठी वरदानच..आपल्या रोजच्या चौरस आहारातील महत्त्वाचा घटक..या डाळींपासून चरचरीत फोडण्या देऊन केलेल्या सरीसरीत आमट्या ,वरण म्हणजे जेवणातला कोरडा घास टाळण्याचा खमंग उपाय..नुसत्या वासानेच क्षुधा प्रदीप्त होते..आणि या सात्विक जेवणाचे चार घास जास्त जातात पोटात..चला तर मग खमंग फोडणीचे वरण कसे करतात ते पाहू या.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या