पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)

#LCM1
हिरव्या गरांचा पावटा हा भारतात भरपूर प्रमाणात आढळतो. पावटा हा अत्यंत पाचक आहे, तसेच पावट्यात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, आर्द्रता, तंतुमय पिष्टमय पदार्थ, ब आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

कुकिंग सूचना
- 1
पावटा सोलून त्याच्या बिया आणि बटाट्याचे छोटे तुकडे स्वच्छ धुऊन घ्यावा. कढईत तेल घालून गरम झाल्यास त्यात जिरं मोहरी घातले जिर मोहरी तडतडले की लसूण, कांदा कढीपत्ता घालून कांदा गुलाबीसर करून घेतला आणि त्यात टोमॅटो बरोबर हळद, काळा मसाला घालून मिक्स केले.
- 2
शेंगदाणे कूट, वाटण घालून नीट परतून घ्यावे. त्यामध्ये पावटा आणि बटाटा घालून मिक्स करून घेतले झाकण ठेवून पाच मिनिटे कमी आचेवर परतून घेतली ळणि नंतर त्यात पाणी मीठ घातले आणि छान ढवळून घेतले. उकळी आली की झाकण ठेऊन 15 मिनिट पावटा बटाटा शिजवून घेतला. भाजी शिजली की कोथिंबीर पेरावी.
- 3
यातल्या लाल तिखटामुळे भाजीला छान रंग येतो आणि दाण्याच्या कुटामुळे ती चवीलाही छान लागते.
हि भाजी पोळी भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर झकास लागते. - 4
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या