शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एक लिटर दूध गॅसवर ठेवून सतत ढवळत रहा आणि त्याला अर्धहोईतोवर आटवून द्या. त्यात साखर घालून रबडी तयार करून घ्या. पूर्णपणे थंड करा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
- 2
ब्रेडचा स्लाईस घेऊन त्याचे कडा काढून घ्या.
- 3
एका तव्यावर तूप घाला ब्रेडचे स्लाईस मधनं कापून त्रिकोणी आकाराचे करून तुपात छान खरपूस भाजून घ्या.
- 4
ब्रेडचे स्लाईस एका प्लेटमध्ये अरेंज करा. आता थंड झालेल्या रबडीवर मिल्क मसाला घाला. ही मस्त थंड थंड रबडी या ब्रेडच्या स्लाईस वर घालून त्यावर पिस्ता बदाम घाला व शाही तुकडा डेझर्ट म्हणून खायला द्या
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16773482











टिप्पण्या