खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)

#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या..
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या..
कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला सारणाची सर्व सामग्री एकत्र ठेवावी. तीळ निवडून घ्यावे. गुळ किसून किंवा बारीक करून घ्यावा. त्यानंतर एका पॅनमध्ये तीळ टाकून भाजून घ्यावेत. त्यानंतर त्यातच खसखस टाकून तीही सोबत भाजून घ्यावी.
- 2
आता भाजलेले तीळ आणि खसखस बाजूला काढून थंड करून घ्यावी.
- 3
आता त्याच पॅनमध्ये तूप घालून त्यात बेसन टाकावे.
- 4
थोडा सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यावे. आता थंड झालेले तीळ, मिक्सर पॉट मध्ये टाकून, जाडसर बारीक करावे. खूप बारीक करू नये.
- 5
त्यानंतर त्यात गूळ टाकून पुन्हा छान मिक्स करून घ्यावे. हे तिळगुळ एका बाउल मध्ये काढून घ्यावे.
- 6
या मिश्रणात आता भाजलेले बेसन, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिक्स करावे.
- 7
आता हे मिश्रण पुन्हा मिक्सर मधून काढून घ्यावे.
- 8
या तयार मिश्रणाचे, आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावे. याच गोळ्यांच्या पोळ्या करावयाच्या आहेत आपल्याला.
- 9
आता पोळ्या साठी कणीक मळून घ्यावी. कणीक, मैदा, रवा, बेसन आणि तांदळाचे पीठ चाळून घ्यावे.
- 10
त्यात मीठ आणि गरम केलेले कडकडीत, तेल टाकावे. मिक्स करून घ्यावे व पाण्याने भिजवून घ्यावे. हा तयार गोळा, 15-20 मिनिटे झाकून बाजूला ठेवावा.
- 11
15-20 मिनिटांनी कणीक मळून घ्यावी. त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यावे. जेणेकरून, तिळगुळाचे सारणाचा गोळा त्यात बसेल. त्यानंतर. छोटी पोळी करून, त्यात सारण भरावे. आणि मोदकासारखे बंद करावे. हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. आणि गरम तव्यावर, दोन्ही बाजूंनी तूप घालून खरपूस भाजून घ्यावी.
- 12
अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्यात. आता या पोळ्या, तुपाचा गोळा आणि किंचित आंबटगोड दह्यासोबत सर्व्ह कराव्यात.
Similar Recipes
More Recipes
- लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
- कोथिंबिरीच्या देठांची चटणी (Kothmbir Steam Chutney Recipe In Marathi)
- भाजलेले शेंगदाणे- मेथी भाजी (Shengdana Methi Bhaji Recipe In Marathi)
- तीळ गुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
- गावरान चिवळीचा झुणका (Gavran Chivlicha Zunka Recipe In Marathi)




































टिप्पण्या (2)