खमंग खुसखुशीत बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)

Saumya Lakhan @cook_31557589
#LCM1 पौष्टीक अशा बाजरीच्या कापण्या.
खमंग खुसखुशीत बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 पौष्टीक अशा बाजरीच्या कापण्या.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस चालू करून एका भांड्यात सव्वा कप गूळ घालून त्यात आवश्यक ते नुसार पाणी घालून गूळ विरघळून घ्या. तो पुर्ण विरघळलाकी गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
- 2
तोपर्यंत दुसऱ्या बाजूला एका परातीत दीड कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बाजरी चे पीठ, वेलची पूड, बडीशेप, चिमटी भर मीठ मिक्स करून थंड करून घेतलेला गुळाचा रस त्यात ओतून सर्व मिश्रण एकजीव करून चांगले मळून घ्या.
- 3
एक एक गोळा लाटून वरून तीळ पेरून त्यावर आडवे तिरप्या कापणीच्या साहाय्याने चिरा दया.
- 4
आता दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून त्यात एक एक करून कापण्या तेलात सोडा. आणि खरपूस तळून घ्या.
- 5
तयार गरमागरम बाजरी च्या कापण्या.... वाफळत्या चहा सोबत सव्हऀ करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778175










टिप्पण्या