पोळीचा चिवडा (Policha Chivda Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#लेफ्ट ओव्हर पोळीचा चीवडा , कधी तरी अंदाज चुकतो किंवा दुसरे काही स्ंध्याकाळच्य जेवणात केले तर पोळ्या उरतात. तेंव्हा असा चिवडा किंवा फोडणीची पोळी केली तर संपुन जातो. व खुप छान लागतो.

पोळीचा चिवडा (Policha Chivda Recipe In Marathi)

#लेफ्ट ओव्हर पोळीचा चीवडा , कधी तरी अंदाज चुकतो किंवा दुसरे काही स्ंध्याकाळच्य जेवणात केले तर पोळ्या उरतात. तेंव्हा असा चिवडा किंवा फोडणीची पोळी केली तर संपुन जातो. व खुप छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
४ लोक
  1. 6रात्रीच्या पोळ्या
  2. 2 टे. स्पुन तेल
  3. 1/4 टे. स्पुन मोहरी
  4. १.४ टे. स्पुन जीरे
  5. 1/4 टे. स्पुन हळद
  6. चवीपुरते मींठ
  7. १/४ कप शेंगदाणे १ चीरलेला कांदा
  8. 1चीरलेला कांदा
  9. 1/2 टे. स्पुन साखर
  10. 1 टे. स्पुन हीरवी मिरची
  11. 1 टे. स्पुन लिंबुरस
  12. 4कडीपत्ता
  13. 1 कपदही
  14. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    पर्थम पोळीचे तुकडे करुन मिक्सर ला फिरवुन घ्यावे.एका कढई मधे तेल मोहरी घालुन फोडणी करावी व त्या मधे कडीपत्ता व कांदा घालुन परतावे,शेंगदाणे घालावे.

  2. 2

    सर्व चांगले परतल्यावर त्या मधे पोळीचा चुरा घालुन चांगले मिक्स करावे.हळद वमीठ घालावे,साखर घालावी व मिक्स करावें.

  3. 3

    लिंबुरस घालावा. व चांगले मिक्स करावे वर कोथींबीर घालावी.व गरमच सर्व्ह करावे फोडणीची पोळी बरोबर दही व लोणचे द्यावे.सकाळ चा ब्रेकफास्ट छान होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes