झटपट फोडणीचा भात (Phodnicha Bhaat Recipe In Marathi)

# तांदूळ रेसिपीज साठी मी आज माझी झटपट फोडणीचा भात ही रेसिपी पोस्ट करत आहे.
झटपट फोडणीचा भात (Phodnicha Bhaat Recipe In Marathi)
# तांदूळ रेसिपीज साठी मी आज माझी झटपट फोडणीचा भात ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 2 मेजरिंग कप तांदूळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतले. आणि त्यात 4 मेजरिंग कप पाणी घालून भात चांगला शिजवून घेतला.
- 2
मग कुकर थंड झाल्यावर त्यातून शिजवून घेतलेला भात काढून घेतला.
- 3
नंतर एका कढईत 3 मोठे चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा राई तडतडल्यावर 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. मग त्यात 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला, आणि कांदा चांगला परतून घेतला.
- 4
मग त्या फोडणीत 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 काश्मिरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळद घालून, चांगले मसाले परतून घेतले.
आणि त्यावर शिजवून घेतलेला भात घालून तो चांगला मिक्स करून, छान परतून घेतला. - 5
नंतर परतून घेतलेल्या भातामध्ये चवीनुसार मीठ घालून 5 मिनिटे मंद गॅसवर 5 मिनिटे शिजवून घेतला.
- 6
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपला गरमा गरम फोडणीचा भात. हा फोडणीचा भात चवीला अतिशय सुंदर लागतो.
Similar Recipes
More Recipes















टिप्पण्या