मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)

#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 छोटा चमचा मोहरी घालून ती चांगली तडतडल्यावर, त्यात 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला.
- 2
मग त्यात 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट मसाला, 2 चमचे सुके खोबरे, कांदा भाजून बारीक वाटून घेतलेला मसाला घालून ते मिश्रण चांगले परतून घेतले.
- 3
नंतर त्यात मोड आलेली मटकी आणि 2 बटाटे चिरून घालून, भाजी चांगली परतून घेतली. आणि त्यात 2 कप पाणी घालून भाजीवर झाकण ठेवून चांगली शिजवून घेतली.
- 4
5 मिनिटांनी भाजी पुन्हा चांगलीं ढवळून, त्यात चवीनुसार मीठ, 1 टोमॅटो बारीक चिरून घालून, भाजी 2 मिनिटे शिजवून घेतली. आणि गॅस बंद केला.
- 5
आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे, आपली गरमा गरम मटकी बटाटा भाजी.
Top Search in
Similar Recipes
More Recipes












टिप्पण्या