खोबऱ्याची फोडणी दिलेले वरण (Khobryachi Fodniche Varan Recipe In Marathi)

#TR
तडका रेसिपीज
फोडणीचे वरण आपण अनेक प्रकारे करतो. आज मी सुक्या खोबऱ्याची फोडणी देऊन केलेल्या, वरण केले आहे.
खोबऱ्याची फोडणी दिलेले वरण (Khobryachi Fodniche Varan Recipe In Marathi)
#TR
तडका रेसिपीज
फोडणीचे वरण आपण अनेक प्रकारे करतो. आज मी सुक्या खोबऱ्याची फोडणी देऊन केलेल्या, वरण केले आहे.
कुकिंग सूचना
- 1
अर्धा कप तुरीचीडाळ स्वच्छ धुऊन घेऊन, त्यात पाणी घालून, तीन-चार शिट्ट्या करून कुकरला शिजवून घेणे. लसूण,खोबरे व टोमॅटो यांचे बारीक तुकडे करून घेणे.
- 2
लसूण व खोबरे मिक्सरला किंवा खलबत्त्यात बारीक कुटून घेणे. फोडणीची कढई गॅसवर तापत ठेवून त्यात तेल घालणे.तेल तापले की त्यात जीरे,मोहरी घालून तडतडली पाहिजे.
- 3
गॅस मंद आचेवर ठेवावा.हिंग, चिरलेला टोमॅटो घालावा. वाटलेले खोबरे व लसूण यांचे वाटण, हिरव्या मिरच्या घालून परतणे. वाटण थोडेसे गुलाबीसर होऊ देणे.
- 4
कढीपत्ता व हळद घालून घेणे. शिजवलेली डाळ रवीने घोटून घेणे. व्यवस्थित मिक्स केलेली फोडणी वरणावरती ओतून घेणे.(माझ्याकडे कढीपत्ता नव्हता.म्हणून मी घातला नाही.)
- 5
त्याच कढईत थोडेसे पाणी घालून घेणे व ते पाणी वरणात घालून घेणे. जेवढे वरण हवे, तेवढे पाणी घालून घेणे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेणे. वरण उकळत ठेवणे. वरणाला चांगली उकळी आली की गॅस बंद करणे. वरून चिरलेली कोथिंबीर घालून घेणे.
*टीप:-पाणी गरम करूनच घालणे.म्हणजे चव छान येते.
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या