दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)

#BWR
बाय-बाय विंटर रेसिपीस
काही जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही.अशा प्रकारे भजी करूनही तुम्ही खाऊ शकता.
दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)
#BWR
बाय-बाय विंटर रेसिपीस
काही जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही.अशा प्रकारे भजी करूनही तुम्ही खाऊ शकता.
कुकिंग सूचना
- 1
दुधी भोपळा सालून व धुऊन घेणे. सुरीने त्याचे मध्यम जाडसर आकाराचे,गोल काप करून घेणे. मध्यम आकाराच्या बाटलीचे टोपण घेणे. मी हिंग डबीचे झाकण घेतले आहे.
- 2
एक गोल काप घेऊन त्याच्यामध्ये झाकण ठेवणे व दाबून मधला गोल करून घेणे. अशाप्रकारे सर्व गोल रिंग्स तयार करून घेणे.
- 3
लाल तिखट व मीठ रिंग्स् ला लावून, चोळून बाजूला ठेवणे. एका बाऊलमध्ये बेसन पीठ व तांदळाचे पीठ घेणे.
- 4
सर्व मसाले घालून घेणे. ओवा हाताने चोळून त्यात घालावा. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे. थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घेणे.
- 5
गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे. भिजवलेल्या पिठात थोडी कोथिंबीर चिरून घालणे. पीठ घट्ट वाटत असल्यास, एक टेबलस्पून पाणी घालून, हलवून घेणे. दोन-तीन रिंग पिठात बुडवून घेणे.
पीठ व्यवस्थित निथळून घेणे. - 6
पिठात बुडवून व ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून घेणे.नंतर तेलात सोडावे. कढईत जेवढे मावतील, तेवढे घालून घेणे. दोन्ही बाजूने छान लालसर होईपर्यंत तळून घेणे.
गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
*माझ्याकडे आज ब्रेडक्रम्स नव्हते, म्हणून मी लावले नाही. तसेच तळले. तेही छान लागतात. - 7
अशाप्रकारे सर्व भजी तळून घेणे. टोमॅटो सॉस बरोबर किंवा नुसती खाल्ली तरी छान लागतात.
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या