मेदुवडा सांभार चटणी (Medu Vada Sambar Chutney Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#BWR बाय बाय विंटर साठी मी माझी मेदुवडा सांभार चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

मेदुवडा सांभार चटणी (Medu Vada Sambar Chutney Recipe In Marathi)

#BWR बाय बाय विंटर साठी मी माझी मेदुवडा सांभार चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 500 ग्रॅमउडीद डाळ
  2. 1/2 वाटीओला नारळ किसून
  3. 8हिरव्या मिरच्या, कोथिंबीर
  4. 1 चमचाजीरे , 1.5 इंच आले
  5. कोथिंबीर
  6. सांभार साठी
  7. 1शेवग्याची शेंग, 1 चमचा राई
  8. 250 ग्रॅमतांबडा भोपळा
  9. 2वांगी
  10. 1कांदा बारीक चिरून
  11. 2टोमॅटो बारीक चिरून
  12. कोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पातेल्यात 500 ग्रॅम उडीद डाळ स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेतली. आणि त्यात पाणी घालून 3-4 तास भिजत ठेवली.

  2. 2

    4 तासाने उडीद डाळ मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतली. आणि एका बाउल मध्ये काढून घेतली.

  3. 3

    नंतर एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा राई घालून ती चांगली तडतडल्यावर त्यात एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून तो चांगला परतून घेतला.

  4. 4

    मग त्यात 1 चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 3 मोठे चमचे कांदा,सुके खोबरे भाजून वाटून घेतलेला मसाला, 2 टोमॅटो बारीक चिरून घालून सर्व साहित्य चांगले परतून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात शिजवून घेतलेली तूरडाळ, मुगडाळ घालून ते चांगले मिक्स करून घेतले. आणि त्यात 2 वांगी,1 शेवग्याची शेंग, भोपळा बारीक चिरून घालून, त्यात 1 चमचा सांभार मसाला घालून, ते चांगले शिजवून घेतले.

  6. 6

    मग अर्धी वाटी नारळ, 7-8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 1 चमचा जीरे आणि कोथिंबीर घालून मिक्सर मधून चटणी वाटून घेतली.

  7. 7

    सर्वात शेवटी एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात वाटून घेतलेलया उडीद डाळीचे वडे करून ते चांगले तळून घेतले.

  8. 8

    आणि आता खाण्यासाठी तयार आहेत आपले गरमा गरम मेदुवडा सांभार चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes