बिटरुट डाळ वडा

हेल्दी रेसिपी कूकस्नॅप यासाठी
मी भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
आज रंगपंचमी त्यामुळे नाष्टा ही रंगीतच केला. लाल बिट,पिवळी हरबरा डाळ, हिरव्या रंगाची मिरची व कोथिंबीर .
बिटरुट डाळ वडा
हेल्दी रेसिपी कूकस्नॅप यासाठी
मी भारती सोनवणे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.
आज रंगपंचमी त्यामुळे नाष्टा ही रंगीतच केला. लाल बिट,पिवळी हरबरा डाळ, हिरव्या रंगाची मिरची व कोथिंबीर .
कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ स्वच्छ धुऊन, दोन-तीन तास भिजत ठेवणे. डाळ भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकणे. बीटाचे साल काढून,धुऊन घेणे. कांदा, हिरवी मिरची, आले चिरून घेणे.
- 2
बिटाचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेणे. डिश मध्ये काढून घेणे. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, हिरवी मिरची,आलं,कोथिंबीर घालून मध्यम जाडसर वाटून घेणे. वाटताना पाणी घालायचे नाही. वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये काढून घेणे. त्यात वाटलेले बिट ही घालून घेणे.
- 3
बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ व जिरे घालून घेणे.
- 4
सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे व त्याचे छोटे-छोटे गोळे करून, हातावर थापून वडे करून घेणे. एका बाजूला गॅसवर कढईत तेल तापत ठेवणे. तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवून, कढईत बसतील तेवढे वडे घालून घेणे.
- 5
दोन्ही बाजूंनी वडे छान तळून घेणे. हे वडे दही किंवा चटणी सोबत खाणे.
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या