मटार करंजी

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

मटार करंजी
बाय बाय विंटर रेसिपीज
#BWR
हिवाळ्याला बाय बाय करताना पुन्हा एकदा ताज्या ताज्या खमंग खुसखुशीत मटार करंजीचा बेत करुन त्यावर ताव मारणं हा दरवर्षीचा नित्यनियमच..😍😋 कारण खाण्यासाठी काय पण..😀 त्यासाठी मटार आणा.. ते निवडून ठेवा..मटार करंजीची तयारी करा.. हे सर्व कष्ट त्या गरमागरम खमंग खुसखुशीत मटार करंजीच्या पहिल्या घासासाठी आणि त्यानंतरच्या अनेक घासांसाठी बरं का..😜..त्याच बरोबर करंजी तळताना घरभर दरवळणार्या खमंग सुवासासाठी पण..🤩चला तर मग या वर्षीच्या हिवाळ्याला बाय बाय करताना मस्त मटार करंजीचा आस्वाद घेऊ या आणि पुढच्या वर्षीच्या हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहू या..😍

मटार करंजी

मटार करंजी
बाय बाय विंटर रेसिपीज
#BWR
हिवाळ्याला बाय बाय करताना पुन्हा एकदा ताज्या ताज्या खमंग खुसखुशीत मटार करंजीचा बेत करुन त्यावर ताव मारणं हा दरवर्षीचा नित्यनियमच..😍😋 कारण खाण्यासाठी काय पण..😀 त्यासाठी मटार आणा.. ते निवडून ठेवा..मटार करंजीची तयारी करा.. हे सर्व कष्ट त्या गरमागरम खमंग खुसखुशीत मटार करंजीच्या पहिल्या घासासाठी आणि त्यानंतरच्या अनेक घासांसाठी बरं का..😜..त्याच बरोबर करंजी तळताना घरभर दरवळणार्या खमंग सुवासासाठी पण..🤩चला तर मग या वर्षीच्या हिवाळ्याला बाय बाय करताना मस्त मटार करंजीचा आस्वाद घेऊ या आणि पुढच्या वर्षीच्या हिवाळ्याची आतुरतेने वाट पाहू या..😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 मिनीटे
6-8 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमैदा
  2. 2 टेबलस्पूनकडकडीत तेलाचे मोहन
  3. चवीपुरते मीठ
  4. 1/2 टी स्पूनओवा
  5. 1/2 टी स्पूनहळद
  6. गरजेनुसार पाणी
  7. स्टफिंग करता
  8. 1 कपताजा हिरवा मटार
  9. 1कांदा
  10. 2 टेबल स्पूनआले मिरची पेस्ट कमी जास्त आवडीनुसार
  11. 1/2 कपजाड पोहे भिजवून
  12. 3/4 कपओले खोबरे
  13. 1 टीस्पूनधने पावडर
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 1 टीस्पूनतिखट
  16. 1/2 टीस्पूनसाखर
  17. 1 टीस्पूनआमचूर पावडर किंवा एक लिंबाचा रस
  18. 1 टेबल स्पूनबडीशेप
  19. भरपूर कोथिंबीर
  20. मीठ चवीनुसार
  21. फोडणी करता तेल जिरे, हिंग हळद

कुकिंग सूचना

90 मिनीटे
  1. 1

    मटार करंजीची पूर्वतयारी करुन घ्या.
    आलं मिरची पेस्ट करुन ठेवा,कांदा बारीक कापून ठेवा.जाड पोहे भिजवून ठेवा.आता मटार थोड्या पाण्यात भिजवून त्यात मीठ साखर घालून उकडून घेणे आणि नंतर चाळणी मध्ये निथळत ठेवा. असे केल्याने मटारा चा हिरवा रंग छान टिकून राहतो.

  2. 2

    आता एका पराती मध्ये मैदा घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ,ओवा घालून व्यवस्थित मिक्स करा. आता यामध्ये तेल कडकडीत गरम करून याचे मोहन घालावे. नंतरच हळद घाला.नाहीतर आधी हळद घातली तर ती जळेल..हळद आणि तेल मैद्याला व्यवस्थित चोळून घ्या आणि थोडे थोडे पाणी घालत मैदा (soft) करंजी सारखा भिजवून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा. यामुळे करंजी खुसखुशीत होईल.

  3. 3
  4. 4

    थोडे गार झाल्यावर मिक्सर मध्ये ओबडधोबड वाटून घ्या.आता एका कढईमध्ये तेल घालून जिरे हिंग हळद घालून खमंग फोडणी करा.यामध्ये कांदा घाला. कांदा थोडा परतला की त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालून छान परतून घ्या.
    आता यामध्ये गरम मसाला, धणे पावडर, तिखट,बडिशोप घालून एकदा परतून घ्या.

  5. 5

    नंतर भरडलेले मटार घालून व्यवस्थित एकजीव करा आता यामध्ये भिजवलेले पोहे घालून पुन्हा एक वाफ काढा यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि ओले खोबरे घालून पुन्हा एक दोन वाफा काढा आणि वरून कोथिंबीर घालून सारण तयार करून गार करायला ठेवा.

  6. 6
  7. 7
  8. 8

    आता एकीकडे भिजवलेला मैदा पुन्हा छान मळून घ्या आणि त्याचे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्या.
    आता यामध्ये मटार करंजी चे सारण भरून करंजी व्यवस्थित बंद करून घ्या आणि कातण्याने कातून घ्या किंवा fork च्या साह्याने करंजी छान पैकी बंद करून घ्या. अशाप्रकारे सर्व करंज्या तयार करा आणि वरून एक ओलसर फडक्याने करंज्या झाकून ठेवा म्हणजे त्या सुकणार नाहीत.

  9. 9

    नंतर कढईमध्ये तेल घेऊन तेल तापले की मध्यम आचेवर सोनेरी रंगावर मटार करंज्या छान पैकी तळून घ्या.

  10. 10

    तयार झाल्या आपल्या खमंग खुसखुशीत गरमागरम मटार करंज्या..हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर या मटार करंज्या सर्व्ह करा किंवा नुसत्याच खाऊ शकता कारण अतिशय चविष्ट स्वादिष्ट रुचकर अशा मटार करंज्या तयार होतात..

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes