कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व बारीक चिरून करून घेतले पालक ब्लांच करून त्याची प्युरी करून घेतली.
- 2
आता तीन बाऊल घेऊन पहिल्या बाऊलमध्ये बीट दुसऱ्या बटाटा व कांदा तिसऱ्या झुकीनी व पालक प्युरी असे घालून घेतले.
- 3
मग बीटच्या बाऊलमध्ये जीरे पावडर तिखट व काळ मीठ घातले. बटाटा व कांदा ह्या बाऊलमधे जीरे पावडर मिरपूड व काळ मीठ घातले.झुकिनीच्या बाऊलमध्ये जिरे पावडर काळ मीठ व मिरपूड घातले. सर्व बाऊल मधील मिश्रण मिक्स करून घेतले. दही फेटून घेतले.
- 4
आता तिन्ही बाऊलमध्ये गरजेनुसार दही घालून मिक्स करून घेतले मग ते तीन ग्लास मध्ये वेगवेगळे घालून चौथ्या ग्लास मध्ये प्रथम बीटचा लेअर त्यावर बटाटा व कांद्याचा लेअर आणि शेवटी झुकिनी व पालकाचा लेयर असे घालून घेतले.
- 5
तयार सॅलड चे ग्लासेस ट्रे मध्ये ठेवून काकडी ने गार्निश केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16917981










टिप्पण्या