कुकिंग सूचना
- 1
प्रथम धणे, जिरं,बडीशेप तव्यावर भाजून घेणे व ते जाडसर वाटून घेणे त्यानंतर मिरची,आलं,लसूण हे पण जाडसर वाटून घेणे.
- 2
कढईत थोडे तेल घालून हिरवा मसाला चांगला परतून घेणे नंतर त्यात धणे, जिरं, बडीशेप ची पावडर घालून परतणे व नंतर हळद मसाला गरम मसाला घालावा सर्व एकजीव करणे.
- 3
तयार मिश्रणात बेसन घालून चांगले परतून घ्यावे व नंतर थोडे थोडे पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे.
- 4
मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात कोथिंबीर घालून एकत्र करावी व छोटे छोटे गोळे तयार करावे मळलेल्या पिठाची वाटी करून त्यात तो गोळा ठेवून कचोरी तयार करावी.
- 5
तयार केलेली कचोरी अजून थोड्या हलक्या हाताने लाटून तेलात मंद आचेवर फ्राय करून घेणे चविष्ट कचोरी तयार.
- 6
दोन वाटी मैदा घेऊन त्यात थोडे मीठ व तेल घालून चांगले एकजीव करून घट्ट दाबून बघावे त्याचा गोळा झाल्यावर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे कचोरीच्या कव्हर साठी.
Top Search in
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या