पुरणपोळी (PURANPOLI RECIPE IN MARATHI)

पुरणपोळी (PURANPOLI RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
- 2
डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.
- 3
मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे.
- 4
मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ २ तास मुरू द्यावे.
- 5
पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
- 6
पोळपाटावर थोडी तांदुळाची पिठी घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी.
- 7
तव्यावर खरपूस भाजून घ्यावी
- 8
साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes













टिप्पण्या