कलिंगड हलवा/शीरा

#उपवास
उपवासाला शक्यतो आपण फळं खातो आणि सहज उपलब्ध आणि बहुतेक जणांना आवडणाऱ्या फळांमध्ये म्हणजे तो कलिंगड... आपण खूप आवडीने खातो आतला भाग खाऊन बाकी आपण टाकून देतो आणि टाकून देणारा भाग जास्त असतो तर आता असं न करता आपण सालीचा पांढरा भाग घेऊन त्याचा हलवा बनवुयात आणि खरंच खूप छान लागतो दुधीच्या हलव्याला हा उत्तम पर्याय आहे

कुकिंग सूचना
- 1
कलिंगडाचा तांबडा भाग व हिरवी साल काढून घ्या
पांढरा भाग किसून घ्या - 2
घट्ट पिळून पाणी काढून टाका व तो कीस कढईत तुपावर मंद गॅसवर खमंग परतवून घ्या
- 3
नंतर थोडी दुधाची पावडर,वेलची पूड व साखर घालून ढवळून घ्या साखरेचा पाक होईल
- 4
मग आच मध्यम करून झाकण ठेवून छान वाफेवर शिजवून घ्या
- 5
मिश्रण कोरडे व्हायला लागले की गॅस बंद करा व आवडीप्रमाणे त्यात ड्रायफ्रूट घाला मिश्रण एकत्र करून घ्या मस्त गरमागरम सर्व्ह करा चवीला हा हलवा उत्तम लागतो
- 6
- 7
टीप
प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या छान फुलून येतो आवडीनुसार मावा घालु शकता
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या