अळिवाची खीर (उपासासाठी खास पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#उपवास
अळीव म्हणजे हलिम, हलिव, Garden Cress Seeds. हा सब्जा नाही आणि जवस / अळशी ही नाही. पोस्टमध्ये अळिवाचा फोटो दिलाय.
अळिवाचे लाडू, अळिवाची खीर फक्त बाळंतिणीनंच खावे असं नाही. अळीव खूप पौष्टिक असतात. प्रत्येकाने रोज एक चमचा अळीव खावे असं nutritionists सांगतात. Celebrity nutritionist Rujuta Divekar calls Aliv as one of the Indian Superfoods. ही पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर तुम्ही दुधाऐवजी घेऊ शकता. ही उपासालाही चालते. रेसिपी अगदी सोपी आहे. ही पारंपारिक रेसिपी आहे. माझी आजी, आई अशी खीर बनवायची. गरमागरम खीर प्यायला खूपच छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. १ टेबलस्पून अळीव
  2. अर्धा लिटर दूध (फुल क्रिम घेतलं तर चांगले)
  3. ४-५ चमचे साखर
  4. पाव चमचा वेलची पूड

कुकिंग सूचना

50 मि
  1. 1

    अळीव अर्धा कप पाण्यात अर्धा तास भिजवा. अळीव पाण्यात भिजवल्यावर खूप फुगतात. म्हणून जरा मोठ्या बाउल मध्ये भिजवा. आणि दिलेल्या  मापापेक्षा जास्त अळीव घालू नका. भिजवलेलं अळीव भिजवलेल्या सब्जा सारखं दिसतं.

  2. 2

    दुधाला उकळी आणून ७-८ मिनिटं मंद आचेवर आटवा.

  3. 3

    त्यात भिजलेले अळीव घालून ढवळा. ५ मिनिटं उकळा.

  4. 4

    साखर घालून परत ५ मिनिटं उकळा. वेलची पूड घाला. ही खीर फार दाट  नसते. मसाला दुधापेक्षा जराशी दाट असते.   

  5. 5

    अळिवाची स्वादिष्ट खीर तयार आहे. गरमागरम खीर सर्व्ह करा. 

  6. 6

    ह्यात तुम्ही सुके मेवे पण घालू शकता. सुके मेवे बारीक तुकडे करून वेलची बरोबर घाला आणि २ मिनिटं खीर उकळवा. पण सुक्या मेव्याशिवाय सुद्धा खूप छान लागते. 

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes