#पनीर हलवा
कुकिंग सूचना
- 1
एका पॅन मध्ये दुध उकळून घावे नॉर्मल आचेवर आणि पनीर बारीक कुस्करून घ्यावे गाठी राहू नयेत असे.
- 2
दुध एकसारखे ढवळत राहावे. दुध अर्धे झाले की त्यामध्ये कुस्करलेले पनीर घालुन पुन्हा एकसारखे ढवळत राहावे करण असे न केल्यास दुध फाटण्याची शक्यता असते.
- 3
वरील मिश्रण एकसारखे ढवळावे. आता मिश्रण घट्ट झाले की त्यात साखर घालून पुन्हा एकसारखे ढवळावे कारण साखरेचे पाणी सुटते.
- 4
आता दुसऱ्या पॅन मध्ये 2 चमचे तूप घालून ड्रायफ्रूट सोनेरी रंगावर तळून घ्यावे
- 5
आपला हलवा तयार झाला आहे त्यामध्ये थोडे तळलेले ड्रायफ्रूट टाकून एकसारखे मिसळून घ्या
- 6
आपला पनीर हलवा खाण्यासाठी तयार झाला आहे. आता हलवा एक डिश मध्ये ठेऊन वरून राहिलेल्या ड्रायफ्रूट नी सजवा. खाण्यासाठी खुप चविष्ठ लागतो.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11503544
















टिप्पण्या