त्रिरंगी मटार पनीर करंजी ओळखलेले शब्द.. मटार,पनीर,मैदा

Kanchan Chipate
Kanchan Chipate @cook_20298781

हिवाळा ऋतु म्हटले की खाण्यापिण्याची चंगळ असते .या दिवसांत बाजारात हंगामी सर्वच भाज्या,फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात .तसेच यावेळी अनेक पौष्टीक पदार्थ बनवायला वेगवेगळ्या भाज्या मिळत असल्याने गृहिणीना स्वयंपाक करायला हुरूप व उत्साह येतो .
मला ही आला .त्यामुळे मी आज मटारची पनीर घालुन तिखट करंजी बनवली...😊😊 #Goldenapron3 Week2

त्रिरंगी मटार पनीर करंजी ओळखलेले शब्द.. मटार,पनीर,मैदा

हिवाळा ऋतु म्हटले की खाण्यापिण्याची चंगळ असते .या दिवसांत बाजारात हंगामी सर्वच भाज्या,फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात .तसेच यावेळी अनेक पौष्टीक पदार्थ बनवायला वेगवेगळ्या भाज्या मिळत असल्याने गृहिणीना स्वयंपाक करायला हुरूप व उत्साह येतो .
मला ही आला .त्यामुळे मी आज मटारची पनीर घालुन तिखट करंजी बनवली...😊😊 #Goldenapron3 Week2

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५/३०मिनिटे
४/५ व्यक्ती
  1. २५०ग्राम मैदा
  2. १००ग्राम पनीर (किसलेले)
  3. गरजेनुसार तेल
  4. १,२ टीस्पुुन आले लसुण,मिरची,जिरे,बडीशोप, पेस्ट
  5. १ टीस्पुन तीखट
  6. १ टीस्पुन जिरे,मोहरी
  7. १ टीस्पुन साखर
  8. १/२ टीस्पुन हळद
  9. १ टीस्पुन आमचुर पावडर
  10. १ टीस्पुन गरम मसाला
  11. १ टीस्पुन धनेजिरे पुड
  12. चिमूटभरहिंग
  13. आवडीनुसार खायचे रंग
  14. गरजेनुसार मीठ
  15. आवश्यकतेनुसार पाणी
  16. ३,४हिरव्या मिरच्या,कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना
  17. २५० ग्राम दही

कुकिंग सूचना

२५/३०मिनिटे
  1. 1

    पारी...मैदा घेऊन त्यात २ चमचे तेल व मीठ घालुन छान चोळुन घेतले.पाणी घालुन मळुन गोळा १०मिनिटे झाकुन ठेवला.नंतर चांगले मळून त्याचे तीन सारखे भाग केले व दोन भागांत आवडीनुसार रंग घालुन मळून घेतले.प्रत्येक गोळ्याची मोठी पोळी लाटून घेतली.तिन्ही पोळ्या एकावर एक ठेऊन घट्ट असा रोल तयार करून घेऊन सुरीने कापुन लाट्या तयार केल्या.

  2. 2

    सारण..... पातेल्यात तेल घालून गरम झाल्यावर जिरे घातले ते चांगले फ़ुलल्यावर तयार केलेली मिरची,आलेलसून,बडीशेफ, जिरे पेस्ट घालून होऊ दिले.मिक्सरमध्ये जाडसर वाटलेले वाटाणे घालून परतुन घेऊन त्यात सर्व मसाले घालून छान परतवून घेतले.नंतर त्यात किसलेले पनीर घालून मिश्रण एकसारखे करून घेतले नि मंद गॅसवर होऊ दिले.मसाला चांगला शिजल्यावर त्यात कोथिंबीर घालुन एक वाफ काढून घेऊन गॅस बंद करून थोडे थंड होऊ दिले.

  3. 3

    तयार केलेली लाटी घेऊन पोळपाटावर पाहिजे त्या आकाराची पाती लाटून घेऊन त्यात सारण भरले नि अर्धी पाती दुमडून व्यवस्थित दाबुन वरून पोर्कनी डिझाइन करून घेतले.सर्व करंज्या अशाच प्रकारे करून.गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून मंद गॅसवर हलकेच तळून घेतले.अशा तऱ्हेने सर्व तळून घेतल्या.

  4. 4

    चटणी...दही छान एकसारखे घुसळुन घेऊन त्यात साखर,मीठ,हिंग, घातले.तडका पॅन मध्ये १टेबलस्पून तेल गरम करून त्यात जिरेमोहरी होऊ दिली व हिरवी मिरची,कढीपत्ता, पुदिना, हळद घालून ती फोडणी दहयावर घातली.वरून कोथिंबीर घातली.३,४मिरच्या तळुन घेतल्या.सोबत हिरवी चटणी व सॉस ही आहे.अश्या तऱ्हेने सर्व तयार करून घेऊन सजावट केली.जसे दिसायला सुंदर दिसत आहे त्याच प्रमाणे चव ही खुपच छान आहे.बघा आपणांस कशी वाटते....😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kanchan Chipate
Kanchan Chipate @cook_20298781
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes