पुरणपोळी

#पुरणपोळी होळीच्या दिवशी पुरणपोळी झालीच पाहिजे त्या शिवाय होळी आहे अस वाटत नाही. थोडं थंड आणि थोडे गर्मी अश्या वातावरणात येणारी ही होळी. रंगबेरंगीं रंगाची होळी मला तर खुपच आवडते. आणि पुरणपोळी ती तर काही विचारू नका आधी मला नाही जमायची पण गेल्या 7 वर्षात इतकी प्रॅक्टिस करून करून आता खूप चांगली जमली आहे

कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात चणा डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवा. 2 तासानंतर डाळ कुकर मध्ये टाकून त्यात थोडी हळद व मीठ घाला व 3 ते 4 शिट्या होऊ द्या
- 2
कुकर थंड झाला कि डाळ गाळून घ्या आणि पाणी बाजूला करा.मग त्या डाळ आणि गूळ मिक्स करून भांडे गॅस वर ठेवा पूर्ण चांगले घट्ट होऊ द्या. चमचा टोपात उभा राहील इतका वेळ पुरण घोटून घ्या.
- 3
चणा डाळ शिजत असतानाच. मैदा भिजवून घ्या. पीठ चपातीच्या कणके पेक्षा पातळ मळून घ्या. मी कलरफुल पुरणपोळी पोळी केली म्हणून ते मग पिठाचे चार भाग करून त्यात रंग मिक्स केले
- 4
पुरण घोटून घेतले कि गरम असतानाच पुरण यंत्रातून गाळून घ्या.
- 5
आता मैद्याचा छोटा गोळा लाटून पुराण भरून घेतले व पोळी लाटून घेतली
- 6
ही झाली पुरणपोळी तयार. तुम्ही ती तूप लावून किंवा दुधात भिजवून नाहि तर कटाच्या आमटी शोभत खाऊ शकता. मला चहा शोभत खूपच आवडते
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या