हॉटेलवाली खिचडी

झटपट छान चवदार असा हा मेनू आहे, सगळ्यांनाच आपलासा असा वाटणारा...😊
हॉटेलवाली खिचडी
झटपट छान चवदार असा हा मेनू आहे, सगळ्यांनाच आपलासा असा वाटणारा...😊
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करा.
- 2
सर्वप्रथम बासमती तांदूळ अर्धा तास भिजवत ठेवा. मग टोपात चांगला शिजवून जास्तीचे पाणी काढून गाळून घेऊन वाळत ठेवा.
- 3
तूर डाळ आणि मुग डाळ एकत्र चांगले धुवून शिजवून घेऊ कुकर मध्ये आणि चांगली स्मॅश करू.
- 4
आलं,कांदा, टोमॅटो छान बारीक चिरून घेऊ.
- 5
पॅन छानपैकी गरम झाला की थोडस साजूक तूप घातल की जिरे मोहरी ची फोडणी द्यायची मग बारीक आचेवर कांदा सोनेरी होईपर्यन्त परतावा मग टोमोटो टाकून परतून घ्यावा आलं पेस्ट,लसूण, लाल तिखट, हळद, हिंग टाकून परतून घ्यायचं मग शेवटी गरम मसाला आणि कडीपत्ता टाकावा.
- 6
शिजवलेली डाळ, थोडे पाणी टाकून कड येऊ द्यावा. वरून थोडी कोथिंबीर टाकावी.
- 7
आता वाळत ठेवलेला बासमती तांदूळ त्यात ऍड करावे. चवीनुसार मीठ टाकून छान पैकी ठवणून घ्याव. टोपावर छाकन ठेवून २/३ मिनटं गरम कराव. अश्याप्रकारे आपली हॉटेलवाली खिचडी तय्यार आहे!
- 8
छानपैकी गारनिष करून सर्व्ह करावे. मी इथे नाचणी चा पापड, लोणचं आणि रायत्या सोबत सर्व्ह केलं आहे😊
Keywords
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या