टोमैटो सौस मधिल बेसन रॅविओली (besan ravioli recipe in marathi)
#बेसन
तसे पाहिले तर खूप सोपी गोष्ट सगळ्यांच्या घरी सहज सापडणारी आणी खूप उपयोगाची आयत्या वेळी मदतीला धाऊन येणारी. तर म्हटले चला थोडा वेगळा विचार करावा. तसे ही रेसिपी मी बरेचदा बनवते पण आज बेसन ह्या थीम निमित्त्याने हा वेगळा प्रयत्न.

कुकिंग सूचना
- 1
पारि - प्रथम पारि चे साहित्य एकत्र करुन पाण्याने मळुन गोळा करणे
- 2
सारण- पँन मधे तेल घालुन लसुण परतून घ्या त्यात पालक घालुन नरम होइ पर्यंत परता मग एका बाउल मधे काढून सारणा ची बाकी साहीत्य घालुन सर्व मिश्रण एकजीव करा.
- 3
रेवियोली करण्यासाठी- आधी एका मोठ्या पातेल्यात 1 लिट. पाणी उकळ्ण्यास ठेवा. भिजवलेल्या बेसनाचा गोळ्या ची एक पोळी(नेहमी पेक्ष्या थोडी जाड)लाटून घ्या व छोटे गोल वाटी किन्वा डोणट कटर ने करुन वेगळे काढून घ्या त्याची जोडी करुन घ्या एका गोल पारि वर थोडे सारण ठेवा व वरुन दुसरी गोल पारि ठेउन सील करुन घ्या (खली फोटो मधे दिले आहे व अजुन एक प्रकार दिला आहे) थोड्कयात आपल्याला छोट्या बेसन करंजी करायची आहे
- 4
रेवियोली तैय्यार झाल्या की त्या उकळत्या पाण्यात सोडायच्या व 7/8 मीनीट उकळाय्च्या. एकी कडे सौस तैय्यार करायला घ्या- पँन मधे थोडे तेल घालुन बारिक चिरलेला लसुण फ्राय करुन त्यात त्यात टोमैटो प्युरी टाकायची त्यावर चिल्ली फ्लेक्स, हर्ब्स, मीरे पुड, मीठ, साखर व थोडे पाणी घालुन एक उकळी आली की रेवियोली सौस मधे सोडून द्या व एक- दोन उकळी आली की गैस बन्द करुन द्या. सर्व्ह करतांना पसरट बाउल मधे काढून परमेसान चीज़ आणी कोथिम्बीर ने सजवावे
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या