कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन धुवून त्याला लालतिखट, मीठ,लिंबूरस,हळद लावून 30 मिनिटे फ्रीज मधे ठेवणे.
- 2
नंतर गॅस वर एक पॅन ठेवून त्यामधे खोबरे,आलं,लसूण,व कांदा गोल्डन होईपर्यंत भाजून घेणे. ते थंड झाल्यावर मिकसर च्या भांड्यात घालून बारीक पेस्ट करून घेणे.
- 3
फ्रीज मधले चिकन बाहेर काढणे. आता गॅस वर एक पॅन ठेऊन त्यामधे तेल घालणे. तेल तापल्यावर त्यामधे 2 तमालपत्र घालणे मग त्यामधे 1 कांदा बारीक चिरून घालणे व तांबूस रंगावर भाजून घेणे मग त्यामधे कोथिंबीर घालणे 1 मिनिटे परतवून मग त्यामधे लालतिखट,मिठ घालून 1 मिनिट परतणे मग गरम मसाला व मालवणी मसाला घालून 5 मिनटं परतवणे नंतर त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घालणे व पाणी घालून 15 मिनिटे शिजवून घेणे वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करणे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12446801










टिप्पण्या