समोसा रेसिपी (samosa recipe in marathi)

#cooksnap ही रेसिपी मी Swara Chavan Sangeeta Kadam आणि Varsha Deshpande यांच्या रेसिपी वरून इन्स्पायर होऊन बनवली आहे. तिघांच्याही रेसिपी मध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि घटक होते आणि माझ्याकडे जे उपलब्ध होते आणि जमेल तसे मी हे करून बघितले. 😊 मला कधीच वाटले नव्हते की मी समोसे घरी बनवू शकीन. खूप आनंद झाला की रेसिपी करताना काही चुका मूक नाही झाली. तिघींना धन्यवाद.❤️
समोसा रेसिपी (samosa recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी Swara Chavan Sangeeta Kadam आणि Varsha Deshpande यांच्या रेसिपी वरून इन्स्पायर होऊन बनवली आहे. तिघांच्याही रेसिपी मध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि घटक होते आणि माझ्याकडे जे उपलब्ध होते आणि जमेल तसे मी हे करून बघितले. 😊 मला कधीच वाटले नव्हते की मी समोसे घरी बनवू शकीन. खूप आनंद झाला की रेसिपी करताना काही चुका मूक नाही झाली. तिघींना धन्यवाद.❤️
कुकिंग सूचना
- 1
समोसा कव्हर बनवण्यासाठी आधी पीठ मळून घ्या. त्यासाठी एका बाऊलमध्ये मैदा ओवा जिरं चवीनुसार मीठ आणि गरम तूप ॲड करा. मग थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घ्या. या पिठाच्या गोळ्यावर ओला कपडा ठेवून भाजीची तयारी करायला घ्या.
- 2
स्टफिंग साठी आधी भरड करून घेऊया. ह्यासाठी आलं लसूण मिरची कोथिंबीर हे मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
- 3
आता कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वाटाणे ॲड करून चांगले फ्राय करून घ्या. दोन-तीन मिनिटानंतर लगेच चटणी भरड ॲड करा आणि पुन्हा चांगले परतून घ्या. ज्या स्टेपला खूप छान अरोमा येतो 👍
- 4
आता यामध्ये बडीशेप ऍड करा आणि पुन्हा परतून घ्या. बडीशेप थोडी मऊ झाली पाहिजे पण जर ती दाता खाली आली तर त्याची मजाच वेगळी असते. नंतर धने पूड जिरेपूड आणि लाल तिखट ॲड करून पुन्हा चांगले परतून घ्या. या स्टेप मध्ये आता मीठ घालायचे आहे आणि त्याचं प्रमाण जरा जास्त असावे कारण पुढच्या स्टेप मध्ये आपण उकडलेले बटाटे ॲड करणार आहोत.
- 5
बटाटे ऍड करून झाल्यानंतर चांगले मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण एकजीव करा. मसाला व्यवस्थित पूर्ण स्टफिंग ला लागला पाहिजे. ही झाली आपली भाजी तयार.
- 6
कव्हर साठी मळलेल्या पीठाचे गोळे करून घ्यायचे आहे. या प्रमाणात एक अंदाजे 12 ते 13 गोळे होतात. हे सगळे ओल्या कपड्या मध्येच ठेवा आणि एक एक करून लाटून घ्या. आता या पोळीचे दोन भाग करा. समोसा च्या कडेला चिकटवण्यासाठी एक मैद्याची पेस्ट करून घ्या.
- 7
आता या सेमी सर्कल मध्ये स्टफिंग भरून समोसा चा आकार द्या. ही स्टेप मला मास्टर करता आली नाही. बाजारात मिळतात तसा परफेक्ट शेप आला नाही पण चालायचे 😁 सगळे समोसे करताना नाकात दम आला.
- 8
आता समोसे तळण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल चांगले गरम झाले पाहिजे. गरम तेलात एक एक करुन समोसा तळून घ्या. समस्यांना छान गोल्डन ब्राउन कलर आला पाहिजे.
- 9
गरम गरम समोसे मिंट योगर्ट डिप सोबत सर्व करा
Similar Recipes
More Recipes




















टिप्पण्या (6)