झटपट चटपट चिकन(zhatpat chatpat chicken recipe in marathi)

#cooksnap आज मी माझी मैत्रीण दिप्ती वारंगे हिची झटपट आणि तिच्या सारखीच चटपटीत 😜😊😄चिकन रेसिपी करुन पाहिली आणि ती अक्षरशः नावाप्रमाणेच झटपट आणि चटपटीत झाली. चला बघूया रेसिपी

कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. कढई मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर आणि मऊ होईपर्यंत परतून घ्या.
- 2
परतलेल्या कांद्यात आता हळद लाल तिखट धने जिरे पूड आणि चिकन मसाला घालून परतून घ्या. त्यात दही घालून २ मिनीटे परतून घ्या.
- 3
आता त्यात चिकन घालून एकत्र करावे आणि १० मिनिटे मंद आचेवर कढई वर झाकण ठेवून शिजवावे. १० मिनीटांनी परत एकदा चिकन मिक्स करून १० मिनीटांसाठी झाकून ठेवावे.
- 4
आता शेवटी चिकन मध्ये चाट मसाला लिंबाचा रस मीठ गरम मसाला घालून मिक्स करावे आणि २ मिनिटे झाकून शिजू द्यावे. नंतर गॅस बंद करावा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. Enjoy and stay healthy 😊🙏
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या