कोबीचे कोफ्ते (kobhi kofta recipe in marathi)

#कोफ्ता कोफ्ता हि एक साधी सोपी आणि तितकीच चविष्ट डिश आहे... अनेक प्रकारे करता येणार्या कोफ्त्यापैकी पत्ताकोबीचे कोफ्ते मला जास्त आवडतात... रेसिपी बघा
कोबीचे कोफ्ते (kobhi kofta recipe in marathi)
#कोफ्ता कोफ्ता हि एक साधी सोपी आणि तितकीच चविष्ट डिश आहे... अनेक प्रकारे करता येणार्या कोफ्त्यापैकी पत्ताकोबीचे कोफ्ते मला जास्त आवडतात... रेसिपी बघा
कुकिंग सूचना
- 1
किसून घेतलेल्या कोबी मध्ये हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पूड, मीठ, लाल तिखट आणि बेसन घालून एकजीव करावे.
- 2
तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.
- 3
आता ग्रेव्हीसाठी एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात जिरे हिंग आणि धनेपूड टाकून मंद आचेवर परतून घ्या. त्यात टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि अद्रकची पेस्ट घालून परतावे.
- 4
पेस्ट परतून झाल्यावर त्यात २-३ टेबलस्पून बेसन घालून छान तेल सुटेपर्यंत परतावे.. खाली बेसन चिटकू नये म्हणून सारखे हलवावे.
- 5
आता त्यात गरजेनुसार पाणी, मीठ, लाल तिखट आणि गरम मूळ घालून एकजीव करावे. एक उकळी आली की त्यात दही घालून एकजीव करून झाकण लावून २-३ मिनिटे शिजू द्यावे. मग त्यात कोफ्ते सोडावेत. कोफ्ते ग्रेव्हीमध्ये सोडून गरमागरम सर्व्ह करावे. Enjoy and stay healthy 😊🙏
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)