क्रीमी व्हेजी बेक्ड सूप इन ब्रेड बाऊल (creamy veggie baked soup in bread bowl recipe in marathi)

#सूप
हे सूप बरेच दिवसांपासून करून बघायचेच होते या थीममुळे ते बनवणे शक्य झाले... चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁
क्रीमी व्हेजी बेक्ड सूप इन ब्रेड बाऊल (creamy veggie baked soup in bread bowl recipe in marathi)
#सूप
हे सूप बरेच दिवसांपासून करून बघायचेच होते या थीममुळे ते बनवणे शक्य झाले... चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁
कुकिंग सूचना
- 1
सर्वात ब्रेड बनवण्यासाठी दिड कप पाणी कोमट करून घ्यायचे. त्यातील अर्धा कप पाण्यात अर्धा टी स्पून साखर घालून विरघळवायची. मग त्यात एक टेबलस्पून यीस्ट घालून 10 मिनिटे ठेवायचे. दहा मिनिटानंतर ईस्ट ऍक्टिव्ह होते
- 2
आता दोन कप मैदा मध्ये मीठ, मिक्स हर्ब आणि गार्लिक पावडर घालून मिक्स करायचे आणि आळी करून घ्यायची. त्या आळीमध्ये ॲक्टिव झालरें यीस्ट आणि तेल घालून हलक्या हाताने कणिक मळायची आहे. लागेल तसे थोडे थोडे कोमट पाणी घालायचे. कणिक जास्त पातळ करायची नाही. थोडी घट्ट कणिक करायची. आपल्याला हवी तशी कणिक झाल्यानंतर थोडा मैदा घालत हळूहळू दहा मिनिटे एक सारखी कणिक मरदायची आहे. त्यानंतर एका भांड्यात ठेवून त्यावर थोडे तेल लावायचे आणि त्या भांड्याला प्लास्टिकच्या पेपरने रॅप करायचे आणि एका बाजूला गरम ठिकाणी ठेवायचे.
- 3
कणिक फरमेंट होईपर्यंत इकडे गाजर लांब चिरून घ्यायचे. मेथी स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घ्यायची. तसेच अर्धा कांदा लांब लांब चिरून घ्यायचा आणि अर्धा रेग्युलर चौकोनी चिरुन घ्यायचा. तसेच हिरवी मिरची आणि बटाटा चिरून घ्यायचा.
- 4
आता एका छोट्या प्लेटला थोडेसे तेल लावून त्या आकाराचा गोल कापलेला बटर पेपर ठेवायचा. गॅस वर एक मोठी पसरट कढई ठेवायची. त्यामध्ये स्टॅन्ड ठेवून झाकण ठेवून ती कढई मध्यम आचेवर दहा पंधरा मिनिटांसाठी प्रिहीट करून घ्या. एक तासानंतर कणीक च फर्मेंट होते मधे पंच मारून थोडा मैदा भुरभुरून कणिक थोडीशी पुन्हा म्हणून घ्यायची आणि त्याचे दोन भाग करायचे. एका भागाचा पूर्ण गोल चांगला गोळा करून घ्यायचा आणि हा गोळा बटर पेपर लावलेल्या प्लेटमध्ये ठेवायचा. आणि त्यावर प्लास्टिकचा पेपर घालून ठेवायचा एक पंधरा मिनिटांसाठी.
- 5
पंधरा मिनिटानंतर त्याची साईज थोडी मोठी होते. मग त्यावर मग थोडा प्लस चिन्हाचा कट मारून दूध लावायचे आणि थोडे मिक्स हर्ब भुरभुरायचे. आता ही प्लेट प्री हिट केलेल्या कढईमध्ये बेक करायला ठेवायची. साधारण वीस मिनिटे लागतात. मध्ये मध्ये जरा चेक करून बघायचे ब्राऊन कलर आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि प्लेट बाहेर काढून ठेवायची. आणि त्यावर बटर किंवा तेल काही लावायचं नाहीये. कारण ब्रेड जास्त मऊ होऊ द्यायचा नाही. फक्त त्यावर एक कापड झाकून ठेवायचे.
- 6
आता एका पॅन मधे तेल आणि बटर गरम करून त्यात लांब केलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यात लांब चिरलेले गाजर आणि स्वीटकॉर्न घालून थोडे परतून घ्यायचे. मग त्यात भाज्यांची पेस्ट घालून थोडावेळ परतून घ्यायचे. त्यानंतर त्यात व्हेजिटेबल स्टॉक हळू हळू घालून मिक्स करत जायचे. पाच मिनिटे उकळी येऊ द्यायची.
- 7
चांगली उकळी आल्यानंतर त्यात चीज स्लाईस आणि अर्धा कप फ्रेश क्रीम घालून मिक्स करायचे आणि एक दहा मिनिटात उकळी येऊ द्यायची. दहा मिनिटानंतर सूप थोडे घट्ट होते. मग त्यात थोडे मिक्स हर्ब, आवश्यक असल्यास मीठ आणि मेथीची भाजी घालून मिक्स करायचे. पुन्हा पाच मिनिटं उकळू देऊन गॅस बंद करायचा.
- 8
आता बेकिंग साठी कढई पुन्हा प्रेहीट करून घ्यायची. आता ब्रेडचा बाउल बनवण्यासाठी ब्रेड वरून कट करायचा आणि फोटो दाखवल्याप्रमाणे सुरीने मधोमध कट करून आतील ब्रेड काढून घेऊन बाउल सारखे जागा करून घ्यायची. आता या बाऊलमध्ये सूप भरायचे त्यावर किसलेले चीज घालून ही प्लेट प्री हिट केलेल्या कढईमध्ये ठेवायची. मोठा गॅस करून फक्त दहा मिनिटे म्हणजे फक्त चीज मेल्ट होईपर्यंत बेक करायचे आणि गॅस बंद करून प्लेट बाहेर काढायची.
- 9
तयार आहे आपले गरमागरम सूप... 😍😍😁😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes























टिप्पण्या (2)