पॉवर पॅक रेड सूप (carrot beet soup recipe in marathi)

#सूप
हे सूप गाजर बीट आणि टोमॅटो पासून बनवले आहे. त्यामुळे खूप पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. लहान मुलांसाठी तर खूपच चांगले आहे. चला तर मग बघुया याची रेसिपी... 👍🏻👍🏻😁😁

कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी भाज्या मोठ्यामोठ्या चिरून घ्यायच्या मग एका पातेल्यात बटर गरम करून त्यात पहिला लसूण आणि मिक्स हर्ब घालून थोडावेळ परतायचे.
- 2
5 मिनिटानंतर त्यात भाज्या आणि मीठ घालायचं आणि परतायचं. गॅस बारीक करून झाकण लावून पाच मिनिट ठेवायचे. पाच मिनिटांनंतर त्यात चार ग्लास पाणी घालून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायचे.
- 3
आता त्यातील स्टॉक गाळून घ्यायचा आणि भाज्या थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची
- 4
आता त्याच पातेल्यात एक टेबल्स्पून बटर गरम करून त्यात वाटलेली पेस्ट घालून पाच ते सात मिनिटे परतायचे.. थोड्यावेळ परतल्यानंतर त्यात एक टेबल स्पून मध घालायचा आणि मिक्स करायचे.
- 5
आता त्यात व्हेजिटेबल स्टॉक घालत मिक्स करत हलवायचे. चांगली उकळी आली की त्यात रेड चीली पावडर, मीठ, साखर घालून चांगले मिक्स करायचे आणि सगळ्यात शेवटी फ्रेश क्रीम घालून पाच मिनिटे उकळू द्यायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा करायचा.
- 6
तयार आहे आपले गरमागरम पौष्टिक पॉवर पॅक रेड सूप... 😍😋
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)